महिला, मुलींची छेड काढणाºया उपद्रवी दोन भावांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:33 AM2017-09-25T00:33:42+5:302017-09-25T00:33:42+5:30

सिडको एन-६ मधील मथुरानगरात राहणाºया एका गल्लीतील महिला आणि मुलींची सारखी छेड काढून त्यांचे जगणे मुश्कील करणाºया दोन भावांना सिडको पोलिसांनी रविवारी सकाळी अटक केली

Two brothers arrested for ransom, girls and girls were arrested | महिला, मुलींची छेड काढणाºया उपद्रवी दोन भावांना अटक

महिला, मुलींची छेड काढणाºया उपद्रवी दोन भावांना अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सिडको एन-६ मधील मथुरानगरात राहणाºया एका गल्लीतील महिला आणि मुलींची सारखी छेड काढून त्यांचे जगणे मुश्कील करणाºया दोन भावांना सिडको पोलिसांनी रविवारी सकाळी अटक केली. विशेष म्हणजे २३ सप्टेंबर रोजीच तो छेडछाडीच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटला होता. लॉकमधून बाहेर आल्यानंतर त्याने गल्लीत दहशत निर्माण करून घराच्या खिडकीच्या काचा फोडणे, दुचाकी फोडून तक्रारदारांना मारहाण केली.
बाळू ऊर्फ देवेंद्र ऊर्फ गणेश पैठणे आणि सतीश पैठणे, अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी रहिवाशांनी सांगितले की, आरोपी आणि तक्रारदार महिला आणि नागरिक सिडको एन-६ मधील मथुरानगरात राहतात. ही भावंडे कामधंदा काहीच करीत नाहीत. ते सतत गल्लीतील महिला आणि मुलींची टिंगल उडवतात. त्यांची छेड काढतात. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी घरासमोरील एका महिलेची बाळूने छेड काढली. त्यावेळी पीडितेचा पती आणि शेजाºयांनी त्यास जाब विचारला असता बाळूसह सतीशने त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या गुन्ह्यात पोलिसांनी बाळूला अटक केली आणि २३ रोजी सोडून दिले. त्यानंतर रात्री उशिरा तो दुचाकीने सुसाट गल्लीत आला आणि त्याने व सतीशने दहशत निर्माण करून तक्रारदार महिलेच्या घराच्या खिडकीची काच फोडली. दोन दिवसांपूर्वी पोलिसांना साक्ष देणाºया नागरिकांना शिवीगाळ करून त्यांची दुचाकी त्याने लोटून देऊन आडव्या पाडल्या. यावेळी सतीशनेही त्यांना धमकावले. या घटनेनंतर नागरिकांनी सिडको ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी रात्री त्याला ताब्यात घेतले. यानंतर आज सकाळी त्याला घरी नेऊन सोडले. त्याला पाहून रहिवासी संतप्त झाले.

Web Title: Two brothers arrested for ransom, girls and girls were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.