पोलीस भरतीसाठी गेलेले दोघे सख्खे भाऊ बेपत्ता
By Admin | Published: April 5, 2016 12:29 AM2016-04-05T00:29:34+5:302016-04-05T00:44:48+5:30
औरंगाबाद : शहर पोलीस भरतीसाठी चाललो, असे सांगून घरातून गेलेले दोन सख्खे भाऊ मागील तीन दिवसांपासून बेपत्ता आहेत. या प्रकरणी बेपत्ता तरुणांच्या
औरंगाबाद : शहर पोलीस भरतीसाठी चाललो, असे सांगून घरातून गेलेले दोन सख्खे भाऊ मागील तीन दिवसांपासून बेपत्ता आहेत. या प्रकरणी बेपत्ता तरुणांच्या आईने सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून नोंद करण्यात आली आहे. तसेच मागील आठवडाभरात शहरातील विविध भागातून तब्बल आठजण बेपत्ता झाले आहेत.
पंकज ऊर्फ गणू सतीश साळवे (२३) आणि अक्षय सतीश साळवे (२१, दोघे रा. हर्षनगर, लेबर कॉलनी) अशी बेपत्ता असलेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. याशिवाय संतोष बळीराम कांबळे (२५, रा. शताब्दीनगर), शेख दस्तगीर शेख करीम (५५, रा. अबुबकर मशिदीजवळ, रशिदपुरा), कचरू श्यामराव खिल्लारे (४१, रा. हर्षनगर), रंजित मोहन पवार (३२, रा. सातारा तांडा), विलास यशवंतराव परघने (३२, रा. उस्मानपुरा) आणि सविता प्रकाश शिरसाट (२०, रा. नागसेननगर, उस्मानपुरा) हे बेपत्ता झाल्याबाबत विविध पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
शेख दस्तगीर यांनी मित्राकडे जाऊन येतो, असे सांगितले होते. ते अद्यापपर्यंत घरी आलेले नाहीत. संतोष कांबळे हा २०१४ पासून बेपत्ता आहे. या सर्वांचा शोध पोलीस घेत आहेत.