एकाच कामाची दोन अंदाजपत्रके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:31 AM2017-09-03T00:31:49+5:302017-09-03T00:31:49+5:30

कंधार तालुक्यातील आलेगाव खाडी ते दहिकळंबादरम्यान रस्त्याच्या कामाचे दोन अंदाजपत्रक तयार करणे त्याचबरोबर दुसºयाच कंत्राटदाराच्या नावाने देयके काढून निकृष्ट दर्जाचे काम केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन अधिकाºयांवर कंधार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

Two budget estimates | एकाच कामाची दोन अंदाजपत्रके

एकाच कामाची दोन अंदाजपत्रके

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: कंधार तालुक्यातील आलेगाव खाडी ते दहिकळंबादरम्यान रस्त्याच्या कामाचे दोन अंदाजपत्रक तयार करणे त्याचबरोबर दुसºयाच कंत्राटदाराच्या नावाने देयके काढून निकृष्ट दर्जाचे काम केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन अधिकाºयांवर कंधार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
माहिती अधिकार कार्यकर्ते दत्ता शेंबाळे यांनी हे प्रकरण लावून धरले होते़ २०१२ ते १४ या काळात आलेगाव खाडी ते दहीकळंबादरम्यान रस्त्याचे काम करण्यात आले होते़ त्यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी दोन अंदाजपत्रक सादर केले होते़ तसेच कामात पूलमोºयाचा उल्लेख नसताना करण्यात आला़ जुनाच पूल असताना तो नवीन करुन दाखविण्यात आला़ याबाबत शेंबाळे यांनी तक्रार केली होती़ माहिती अधिकारात माहितीही मागविली होती़ त्यानंतर औरंगाबादच्या दक्षता आणि गुणवत्ता नियंत्रण पथकाने कामाची पाहणी केली़ त्यावेळी अधिकाºयांनी रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून कंत्राटदाराला देयके देणार नसल्याचेही लिहून दिले होते़ परंतु त्यानंतर प्रयाग कन्स्ट्रक्शनचे काम असताना दुसºयाच कंत्राटदाराच्या नावाने बिले काढण्यात आली़ याबाबत शेवटी शेंबाळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती़ न्यायालयाच्या आदेशानंतर शनिवारी कंधार पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त उपअभियंता मोहम्मद असिफोद्दीन व शाखा अभियंता बालाजी शिंदे या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
या प्रकरणाचा तपास सपोनि नांदगावकर हे करीत आहेत़

Web Title: Two budget estimates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.