बदनापूर येथे दोन प्रकरणांत दोघांवर फसवणुकीचा गुन्हा

By Admin | Published: February 22, 2016 12:21 AM2016-02-22T00:21:14+5:302016-02-22T00:21:14+5:30

बदनापूर : तालुक्यातील चनेगाव व पीरसावंगी येथील दोन जणांची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्टाच्या आदेशान्वये दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Two cases of cheating in Badanapur, in two cases | बदनापूर येथे दोन प्रकरणांत दोघांवर फसवणुकीचा गुन्हा

बदनापूर येथे दोन प्रकरणांत दोघांवर फसवणुकीचा गुन्हा

googlenewsNext


बदनापूर : तालुक्यातील चनेगाव व पीरसावंगी येथील दोन जणांची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्टाच्या आदेशान्वये दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील चनेगाव येथील गजानन साहेबराव जायभाये यांनी टाटा कंपनीचा मॉडेल नं ११०९ क्र एम एच - २१ एक्स ४१७७ हा फायनान्सने खरेदी केला. मात्र फिर्यादीकडून त्याच्या हप्त्यांची परतफेड झाली नाही. फिर्यादीने हा ट्रक मो. हमजा मो. हसन रा. जालना यांना १७६६४०० रूपयांत विक्री केला. त्याचे दरमहा ३०२०० रू प्रमाणे ५७ हप्ते भरण्याचा करार केला. दरम्यान फिर्यादीस फायनान्स कंपनीची नोटीस आल्यानंतर समजले की आरोपीने एकही हप्ता भरलेला नाही व ट्रक कोठे आहे याचाही माहिती नाही. अशाप्रकारे फिर्यादीची फसवणूक झाली. सदर प्रकरणी कोर्टाचे आदेशान्वये मो हमजा मो हसन रा जालना याच्याविरुद्ध बदनापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ एस. पी.चव्हाण हे करीत आहेत.
दुसऱ्या प्रकरणी तालुक्यातील पीरसावंगी येथील सरपंच भगवान साहेबराव सोरमारे व शिवाजी बाबूराव वेताळ हे दोघे मिळून गुत्तेदारीचे काम करीत असल्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली याचा गैरफायदा घेत आरोपीने फिर्यादीच्या डिक्कीतून चेक क्र ७६५९३३ चोरून त्यावर बनवाट सही करून ग्रामीण बँक शेलगावमध्ये जमा केला. या चेकवर सही खोटी असल्याचे लक्षात आल्यावर बँकेने सदर चेक मेमोसह परत केल्याने भगवान सोरमारे यांचा आरोपीने विश्वासघात केल्याचे समजले सदर प्रकरणी कोर्टाच्या आदेशावरून शिवाजी बाबूराव वेताळ विरूध्द बदनापूर पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

Web Title: Two cases of cheating in Badanapur, in two cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.