१३ हजार चालकांकडून २ कोटींचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:39 IST2019-02-04T22:39:31+5:302019-02-04T22:39:47+5:30
वर्षभरात नियमांचे उल्लंघन क रणाºया १३ हजार वाहनधारकांकडून २.८५ कोटींचा दंड वसूल केला

१३ हजार चालकांकडून २ कोटींचा दंड वसूल
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाने गेल्या वर्षभरात नियमांचे उल्लंघन क रणाºया १३ हजार वाहनधारकांकडून २.८५ कोटींचा दंड वसूल केला, अशी माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी दिली.
जिल्ह्यातील रस्त्यांवरून वाहतूक नियमांचे उल्लंघन करून धावणाºया वाहनांवर आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. जानेवारी ते डिसेंबर-२०१८ या कालावधीत आरटीओ कार्यालयाने तब्बल १३ हजार वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये योग्यता प्रमाणपत्र नसलेल्यांकडून ६४ लाख ६२ हजार, क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक करणाºयांकडून १ कोटी २४ लाख ७२ हजार, विमा नसलेल्यांकडून २४ लाख ५१ हजार आणि परमिट संपलेल्या वाहनधारकांकडून २४ लाख ५४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. लायसन्स नसताना वाहन चालविणाºयांवरही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ७ लाख ६० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.