दावरवाडीत दोन दरोडे

By Admin | Published: October 22, 2014 12:25 AM2014-10-22T00:25:26+5:302014-10-22T01:20:07+5:30

पाचोड : दावरवाडी : पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील खळवाडीत दोन ठिकाणी दरोडेखोरांनी धुमाकूळ घालीत चाकूचा धाक दाखवून चाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली.

Two dacoits in Dwarwadi | दावरवाडीत दोन दरोडे

दावरवाडीत दोन दरोडे

googlenewsNext

पाचोड : दावरवाडी : पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील खळवाडीत दोन ठिकाणी दरोडेखोरांनी धुमाकूळ घालीत चाकूचा धाक दाखवून चाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवारी भल्या पहाटे घडली. दोन ठिकाणी पडलेल्या दरोड्यांमुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. या मारहाणीत चारजण जखमी झाले.
पाचोड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून भगवान किसनराव काळे, रा. दावरवाडी खळवाडी यांच्या घरी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी खिडकी उघडून आत प्रवेश केला व भगवान काळे यांची सून हिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले.
यानंतर दरोडेखोरांनी घरात असलेल्या पेटीतील नगदी दहा हजार रुपये काढून घेतले व जवळच असलेल्या ज्ञानेश्वर काळे यांच्याकडील मोबाईल हिसकावला व दरोडेखोर पसार झाले. यानंतर त्यांनी आपला मोर्चा मनोहर घोडके यांच्या घराकडे वळवला.
पहाटे साडेतीन वाजता यांच्या घराचा दरवाजा उघडला; पण घरात झोपलेले मनोहर घोडके यांचा परिवार आवाज आल्यामुळे जागा झाला.
त्याचवेळी चार दरोडेखोरांनी मनोहर घोडके यांच्या गळ्याला चाकू लावला व लताबाईचे तोंड दाबले. यावेळी मनोहर घोडके व दरोडेखोर यांच्यात झटापट झाली. घोडके यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; पण एका दरोडेखोराने लोखंडी गजाने घोडके यांना मारहाण केली. यानंतर दरोडेखोरांनी घरातील दोन लोखंडी पेट्या उचलून पोबारा केला. त्यात लताबाईच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र, पेटीत ठेवलेले नाकातील एक सोन्याची नथ, नगदी दहा हजार रुपये व वीस सहावार साड्या होत्या.
यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ पाचोड पोलीस ठाण्यात माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, फौजदार आर.डी. खुणे, जमादार काशीनाथ लुटे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत अलसटवार, दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक अरुण केंद्रे, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली. (वार्ताहर)
पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पाचोड पोलीस दरोडा प्रतिबंधक पथक व गुन्हा शाखा यांचे पथक तयार केले. पाचोड परिसरातील सोनवाडी, साळवडगाव वडजी, खंडाळा, चौंढाळा, टाकळी अंबड, शिवारात पारधी वस्तीवर छापे टाकले.
कोम्बिंग आॅपरेशनमध्ये एका संशयीत दरोडेखोराला ताब्यात घेतले असून त्यास पाचोड पोलीस ठाण्यात आणले आहे.
मारहाणीत ज्ञानेश्वर काळे, त्यांचे वडील भगवान काळे, मनोहर घोडके, लताबाई घोडके जखमी झाले आहेत.

Web Title: Two dacoits in Dwarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.