कल्याण मंडपम् येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:53 PM2017-11-12T23:53:27+5:302017-11-12T23:53:33+5:30
राज्य शासनाच्या मराठी विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने ग्रंथोत्सवाचे आयोजन हिंगोली नगर परिषद कल्याण मंडपम, येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथोत्सव उपक्रमाअंतर्गत १४ व १५ नोव्हेंबर ग्रंथोत्सव सोहळा भरविला जाणार आहे.
हिंगोली : राज्य शासनाच्या मराठी विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने ग्रंथोत्सवाचे आयोजन हिंगोली नगर परिषद कल्याण मंडपम, येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथोत्सव उपक्रमाअंतर्गत १४ व १५ नोव्हेंबर ग्रंथोत्सव सोहळा भरविला जाणार आहे.
१४ नोव्हेंबर रोजी जि. प. बहुविध प्रशाला, येथून ग्रंथदिंडी निघणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अनिल भंडारी असणार आहेत. तसेच जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, खा. राजीव सातव, आ. रामराव वडकुते, आ. बाबाजानी दुर्रानी, आ. विक्रम काळे, आ. सतिश चव्हाण, जयप्रकाश मुंदडा, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. डॉ. संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, मुख्याधिकारी रामदास पाटील, सहाय्यक ग्रंथालय संचालक अ. मा. गाडेकर आदी उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी दूपारी १ वाजता विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन तर ३ वाजता प्रभावी वाचन माध्यमे या विषयावरील परिसंवादाचे आयोजन केले आहे. यामध्ये प्रा. नामदेव दळवी, प्रा. जी. पी. मुपकलवार, प्रा. उत्तम सुपारे, नरेंद्र नाईक प्रा. माणिक डोखळे, पुष्पा सुराणा यांचा सहभाग असणार आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजता ‘ग्रंथाने काय दिले’ या विषयावर परिसंवाद होणार असून यामध्ये प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण, प्रा. डॉ. कुमार भालेराव, प्रा. डॉ. शुत्रुघ्न जाधव, पंडित अवचार आरती मार्डीकर सहभागी होतील. दूपारी २.३० वाजता काव्यवाचन होईल. यात रामचंद्र सावंत, सय्य्द जब्बार पटेल, शिलवंत वाढवे, नामदेव वाबळे, कलानंद जाधव, बबन शिंदे, शफी बोल्डेकर, सिध्दार्थ इंगोले, बबन मोरे, शिवाजी कºहाळे, मिर्झा मसूद बेग, बन्सी बोरा, सिंधू दहिफळे, कृष्णा इंगळे, मीरा कदम, महारुद्र घेणेकर, संगीता चौधरी, यु. एच. बलखंडे, श्रीराम कºहाळे, मुरलीधर नगरकर, विजय गुंडेकर, राजकुमार नायक, महासेन प्रधान, अभय भरतीया, विजय ठाकरे यांचा सहभाग असणार आहे.