‘दयानंद’मध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र
By Admin | Published: January 31, 2017 12:15 AM2017-01-31T00:15:30+5:302017-01-31T00:15:52+5:30
लातूर : दयानंद विधि महाविद्यालयात शिफ्टिंग पॅराडिगम आॅफ एन्व्हायरन्मेंटल इथिक्स या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले.
लातूर : शहरातील दयानंद विधि महाविद्यालयात शिफ्टिंग पॅराडिगम आॅफ एन्व्हायरन्मेंटल इथिक्स या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र रविवारी पार पडले.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी होते. यावेळी पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर, अॅड. बळवंत जाधव, सचिव रमेश बियाणी, सहसचिव सुरेश जैन, संजय बोरा, अॅड. आशिष बाजपाई, अॅड. विक्रम हिप्परकर, डॉ. अॅनी जॉन, डॉ. जी.के. पिल्लाई, डॉ.बी.एच. चौधरी, डॉ. पूनम नाथानी यांची उपस्थिती होती.
यावेळी अॅड. बळवंत जाधव म्हणाले, निसर्गचक्र संतुलित ठेवणे गरजेचे आहे. उसाच्या शेतीमुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. पाण्याचा योग्य वापर करणे काळाची गरज बनली आहे. यावेळी अतुल देऊळगावकर म्हणाले, अणुयुद्ध आणि वातावरणातील बदल हे पर्यावरणासमोरील दोन आव्हाने आहेत. पृथ्वीचे अस्तित्व अबाधित राखणे, जैव विविधतेचा होणारा ऱ्हास, तापमानात होणारी झपाट्याने वाढ तसेच जल-वायू, प्रदूषण कसे रोखावे, यासंदर्भात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभांगी पांचाळ व प्रा. वीणा इंगळे यांनी केले. आभार डॉ. गिरीश पिल्लाई यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.