...अन् दोन दिवसांतच ‘ते’परतले परीक्षा विभागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:43 AM2017-08-01T00:43:52+5:302017-08-01T00:43:52+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या कर्मचाºयांना दोन दिवसांपूर्वी बदलीच्या ठिकाणी पाठविण्यात आले होते; मात्र कर्मचारी संघटनेच्या दबावामुळे या कर्मचाºयांना पुन्हा परीक्षा विभागात परत पाठविण्याचा धक्कादायक निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला.

... in two days in the examination department | ...अन् दोन दिवसांतच ‘ते’परतले परीक्षा विभागात

...अन् दोन दिवसांतच ‘ते’परतले परीक्षा विभागात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या कर्मचाºयांना दोन दिवसांपूर्वी बदलीच्या ठिकाणी पाठविण्यात आले होते; मात्र कर्मचारी संघटनेच्या दबावामुळे या कर्मचाºयांना पुन्हा परीक्षा विभागात परत पाठविण्याचा धक्कादायक निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला.
विद्यापीठाशी संलग्न साई अभियांत्रिकी महाविद्यालयाने परीक्षेत केलेल्या गैरप्रकारामुळे कुलगुरूंनी बदल्या केल्या होत्या. यातील १७ कर्मचारी परीक्षांचे निकाल घोषित करण्यास विलंब होण्याच्या शक्यतेमुळे सोडण्यात आले नव्हते; मात्र बदली झालेल्या कर्मचाºयांना परीक्षा विभागाने गुरुवारी रिलिव्ह के ले. दुसºयाच दिवशी परीक्षा विभागातील ३४ कंत्राटी कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचा धडाकेबाज निर्णय कुलसचिवांनी घेतला.
या निर्णयानंतर विद्यापीठातील कर्मचारी संघटनेने कुलसचिवांची भेट घेऊन परीक्षा विभागाचे कामकाज ठप्प होण्याची इशारेवजा धमकी दिली; मात्र कुलसचिवांनी निर्णय बदलण्यास नकार दिला होता. कुलगुरू दौºयावरून परतताच पुन्हा कर्मचारी संघटनेने त्यांची भेट घेऊन इशारेवजा धमकी दिली. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी रविवारी परीक्षा विभागाला भेट देत आढावा घेतला. त्यानंतर बदल्यांचा निर्णय फिरविण्यात आला.
बदल्यांचे नवे आदेश निघण्यापूर्वीच कर्मचारी परीक्षा विभागात पूर्वीच्या ठिकाणी रुजू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: ... in two days in the examination department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.