दोन डॉक्टरांच्या निलंबनाचे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश
By Admin | Published: February 17, 2015 12:24 AM2015-02-17T00:24:56+5:302015-02-17T00:42:22+5:30
औरंगाबाद : लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद आल्हाट आणि सिद्धनाथ वडगाव (ता.गंगापूर) प्राथमिक आरोग्य कें द्राचे वैद्यकीय अधिकारी
औरंगाबाद : लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद आल्हाट आणि सिद्धनाथ वडगाव (ता.गंगापूर) प्राथमिक आरोग्य कें द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव सोनकांबळे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करण्याचे आदेश सोमवारी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. डॉ. सोनकांबळे यांनी जि. प. सदस्य मनाजी मिसाळ यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार नोंदविली होती.
जिल्हा परिषदेची १२ फेब्रुवारी रोजी तहकूब करण्यात आलेली सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. सदस्यांच्या मागणीवरून जि. प. अध्यक्षांनी हे आदेश दिले. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जि. प. उपाध्यक्ष दिनकर पवार, शिक्षण सभापती विनोद तांबे, बांधकाम आणि अर्थ सभापती संतोष जाधव, महिला व बालकल्याण सभापती सरला मनगटे, शीला चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे, वासुदेव सोळंके यांची उपस्थिती होती.
सभेच्या प्रारंभी सर्वप्रथम लासूर स्टेशन आणि वाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चौकशीचे काय झाले, असा सवाल जि. प. सदस्य रामदास पालोदकर यांनी उपस्थित केला. तेव्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांनी चौकशी अहवालाचे सभागृहासमोर वाचन केले.
या चौकशी अहवालानुसार लासूर स्टेशन येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. आल्हाट हे केवळ तोंडी सांगून एका लग्न समारंभासाठी गेल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी अधिकृत रजा टाकलेली नव्हती.
तर त्याच दिवशी लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णास उपचारासाठी घेऊन गेलेले जि. प. सदस्य मनाजी मिसाळ यांच्या विरोधात गुन्हा नोंदविणारे डॉ. सोनकांबळे हेसुद्धा परवानगी न घेताच तेथे रुग्णसेवेसाठी हजर असल्याचे चौकशीत समोर आले.