गंगाखेड येथील मंदिरातील दोन दानपेट्या पळविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 11:58 PM2017-08-31T23:58:09+5:302017-08-31T23:58:09+5:30
येथील मंदिरातील दोन दानपेट्या पळविल्याची घटना गंगाखेड येथे ३० आॅगस्ट रोजी रात्री घडली. या प्रकरणी गुरुवारी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : येथील मंदिरातील दोन दानपेट्या पळविल्याची घटना गंगाखेड येथे ३० आॅगस्ट रोजी रात्री घडली. या प्रकरणी गुरुवारी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.
शहरातील खडकपुरा गल्लीमध्ये संतसेना महाराज यांचे मंदिर आहे. ३० आॅगस्ट रोजी मंदिराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी दान पेटी पळविली. ही घटना गुरुवारी सकाळी दर्शनासाठी आलेले बालासाहेब पारवे यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. दुसरी घटना गोदावरी नदी काठावर असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिरात घडली. येथेही चॅनल गेटचे कुलूप तोडून मंदिरातील दानपेटी पळविली. या संदर्भात नंदकिशोर डाड यांनी पोलिसांना माहिती दिली. गंगाखेड पोलीस ठाण्याचे जमादार प्रकाश रेवले व इतर कर्मचाºयांनी मंदिरास भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी गोदावरी नदी पात्राजवळ पाहणी केली असता हनुमान मंदिरातील दानपेटी विठ्ठल रुखमाई मंदिराजवळ रिकामी आढळून आली. या दोन्ही दानपेटीतून ८ ते १० हजार रुपये चोरीस गेल्याचा अंदाज आहे.