‘जायकवाडी’चे दोन दरवाजे उघडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 04:10 AM2019-08-16T04:10:49+5:302019-08-16T04:11:57+5:30

दुष्काळी भागातील पाणीप्रश्नावर मात करण्यासाठी पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचे दोन दरवाजे गुरुवारी उघडून गोदावरी नदीच्या पात्रात १०४८ क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली.

 Two doors of 'Jayakwadi' Dam is opened | ‘जायकवाडी’चे दोन दरवाजे उघडले

‘जायकवाडी’चे दोन दरवाजे उघडले

googlenewsNext

औरंगाबाद : दुष्काळी भागातील पाणीप्रश्नावर मात करण्यासाठी पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचे दोन दरवाजे गुरुवारी उघडून
गोदावरी नदीच्या पात्रात १०४८ क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. या पाण्यातून गोदावरी नदीवरील बंधारे भरण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या आदेशानंतर नाथसागरातून पाणी सोडण्यात येत आहे.

नगर आणि नाशिक जिल्ह्यांत गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा ९१ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. परंतु, मराठवाड्यात अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नसल्यामुळे खरिपाची पिके जगविण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे.

नाथसागर भरत आलेला असताना मध्य गोदावरी खोऱ्यात दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे नाथसागरातून पाणी सोडून गेदावरी नदीवरील बंधारे भरण्याची मागणी करण्यात आली होती.

गुरुवारी प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा ९१.९९ टक्क्यांपर्यंत पोहोचला. त्यानंतर दुपारी नाथसागराच्या दोन दरवाजांमधून १०४८ क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्याशिवाय प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून १२०० क्युसेक, उजव्या कालव्यातून ९०० क्युसेक आणि जलविद्युत प्रकल्पासाठी १५८९ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

Web Title:  Two doors of 'Jayakwadi' Dam is opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.