लग्नसोहळ्यात दोन गटात हाणामारी
By Admin | Published: March 27, 2017 11:41 PM2017-03-27T23:41:15+5:302017-03-27T23:45:58+5:30
आष्टी : लग्नाचा कार्यक्रम सुरु असताना कार्यक्रमात वाळू फेकली कारणाने दोन गटात हाणामाऱ्या झाल्या
आष्टी : लग्नाचा कार्यक्रम सुरु असताना कार्यक्रमात वाळू फेकली कारणाने दोन गटात हाणामाऱ्या झाल्या. ही घटना रविवारी रात्री खडकत येथे घडली. या प्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील खडकत येथील रियाज इस्माईल तांबोळी यांचा रविवारी विवाह होता. आदल्या दिवशी संध्याकाळी रातजगाचा कार्यक्रम असल्याने पाहुणे जमले होते. रात्री ११.३० च्या सुमारास गावातीलच नावेद कुरेशी व त्याच्या दोन साथीदारांनी कार्यक्रमात वाळू फेकून पळ काढला.
दुसऱ्या दिवशी घरातील लग्नकार्य उरकल्यानंतर हे प्रकरण मध्यस्थांच्या मदतीने मिटविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, शकील कुरेशीसह बारा जणांनी येऊन लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. भीतीपोटी रियाज तांबोळी व व त्यांच्या नातेवाईकांनी पळ काढला; मात्र आरोपींनी पाठलाग करीत घरात शिरून महिलांना धक्काबुक्की करत मारहाण केली. याप्रकरणी शब्बीर नानुभाई तांबोळी यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिसात शकील कुरेशी, शोयब कुरेशी, गुडू कुरेशी, बबलू कुरेशी, मतीन कुरेशी, मोहसीन कुरेशी, मुझीब कुरेशी, अली कुरेशी, जावेद कुरेशी, सद्दाम कुरेशी, शहीर कुरेशी, मोहंमद कुरेशी, मुनाब कुरेशी (रा.सर्व खडकत,ता.आष्टी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ.अशोक केदार हे करीत आहेत. (वार्ताहर)