फुटबॉल खेळण्यावरून दोन गटांत हाणामारी
By Admin | Published: December 29, 2014 12:42 AM2014-12-29T00:42:58+5:302014-12-29T00:55:36+5:30
भोकरदन : शहरात फुुटबॉल खेळण्याच्या कारणावरून दोन गटात लाठ्याकाठ्यांनी हाणामारी झाली असून भोकरदन पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारी वरून
भोकरदन : शहरात फुुटबॉल खेळण्याच्या कारणावरून दोन गटात लाठ्याकाठ्यांनी हाणामारी झाली असून भोकरदन पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारी वरून दोन्ही गटांच्या १७ जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे़
२७ डिसेबर रोजी शोहेबखॉ आसेफखा पठाण व जुबेरखॉ एजाजखॉ कुरेशी यांच्यात फुटबॉल खेळण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर नंतर दोघांचेही समर्थक एकत्र येऊन त्यांच्यात हाणामारी झाली. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही कडील १७ जणांविरूध्द परस्पर तक्रारी वरून गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत शोहेबखॉ पठाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की हुजेफखॉ कुरेशी, तौफीक कुरेशी, मुसेफ कुरेशी, तौसीफ कुरेशी, जुबेर कुरेशी, अक्रम कुरेशी, असलम कुरशी, यांनी फिर्यादीच्या घरी शिवीगाळ करून लाठ्याकाठ्या घेऊन गेले. गैरकायद्याची मंडळी जमा करून जिवेमारण्याच्या धमक्या दिल्या तसेच घरासमोरील मोटरसायकलची तोडफोड करून नुकसान केल,े अशी तक्रार दिली. त्यावरून वरील सर्व आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे़
तर जुबेरखॉ एजाजखॉ कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शोहेबखॉ आसेफखॉ पठाण, आसेफखॉ पठाण,शफीकखॉ पठाण, माजेदखॉ पठाण, इरफान पठाण, शायोदखॉ पठाण, आमेरखॉ पठाण, इम्रानखाँ पठाण, जुबेरखॉ पठाण, यांनी गैरकायद्याची मंडळी जमा करून मोटरसायकल (कं्रमाक एम एच २१- ए ई - ८३७६) गाडीची तोडफोड करून नुकसान केले. तसेच लाठ्याकाठ्या घेऊन घरा समोर व चौकात येऊन शिविगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या, असे त्यात म्हटले आहे. त्यावरून वरील सर्व आरोपीविरूध्द भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़
या प्रकरणात पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विकास कोकाटे तपास करीत असून पोलिसांनी आद्याप कोणालाही अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.