दोन तास चक्का जाम
By Admin | Published: January 31, 2017 11:38 PM2017-01-31T23:38:05+5:302017-01-31T23:38:47+5:30
जालना : सकल मराठा समाजाने मंगळवारी औरंगबाद चौफुलीवर दोन तास चक्का जाम आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.
जालना : मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यासोबतच कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने मंगळवारी औरंगबाद चौफुलीवर दोन तास चक्का जाम आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. दोन तासांच्या आंदोलनात शिस्त आणि शांतता दिसून आली. विशेषत: युवा वर्गाने आवेशपूर्ण भाषण करून आरक्षणाची गरज पोटतिडकीने व्यक्त केली.
सकाळीच हजारो समाजबांधव स्वयंस्फूर्तीने औरंगाबाद चौफुली परिसरात जमले होते. प्रारंभी विविध घोषणांमुळे आंदोलकांत चैतन्य निर्माण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांपासून समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी आरक्षण देण्याची गरज व्यक्त केली. सुमारे दोन तास झालेल्या या आंदोलनात औरंगाबाद तसेच नागपूर, हैदराबाद आणि सोलापूरकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प होती. जिजाऊ वंदना व राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता करण्यात आली. (प्रतिनिधी)