लाडसावंगी डोंगरावर दोनशे वृक्ष बहरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:05 AM2021-07-02T04:05:07+5:302021-07-02T04:05:07+5:30
लाडसावंगी : येथील जानिमिया डोंगरावर दोन वर्षांपूर्वी लावलेले जवळपास दोनशे वृक्ष चांगले बहरले आहेत. यासाठी गावातील तरुणांनी केलेल्या परिश्रमाला ...
लाडसावंगी : येथील जानिमिया डोंगरावर दोन वर्षांपूर्वी लावलेले जवळपास दोनशे वृक्ष चांगले बहरले आहेत. यासाठी गावातील तरुणांनी केलेल्या परिश्रमाला यश मिळाले आहे. तर दरवर्षी तरुणांकडून लावल्या जाणाऱ्या वृक्षांमुळे या डोंगराला वनाचे स्वरूप येत आहे.
गावातील पन्नास तरुणांनी एकत्र येत व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून दर महिन्याला पैसे गोळा करून निसर्गरम्य असलेल्या डोंगरातील जानिमीया दर्गा परिसरात वेगवेगळ्या जातीचे शंभर वृक्ष लावले आहेत. त्यांचे संवर्धन केले. या परिसरात तरुणांनी चारशे फूट बोअर घेतला. परंतु उन्हात पाणी कमी पडल्याने डोंगरावर माजी जि.प. सदस्य विष्णू खरपे व बाबासाहेब खरपे यांच्या शेतातील विहिरीतून पाणीपुरवठा केला गेला.
गेल्या दोन वर्षांत दर्गा परिसरात पिंपळ, वड, जांबूळ, कडुनिंब व इतर जातीचे दोन वर्षांत अडीचशे झाडे वाढीस लागली आहेत. या झाडांची आज रोजी दहा ते पंधरा फुटांपर्यंत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सकाळ- संध्याकाळ दररोज यातील दहा जण डोंगरावर वृक्ष देखरेखीसाठी जातात. याच दर्ग्यावर प.स. सदस्य अर्जुन शेळके यांनी पंचवीस हजार लीटर पाण्याची टाकी बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने येत्या दोन वर्षात आणखी हजार वृक्ष लागवड करण्याचा मानस तरुणांनी केला आहे.
010721\img_20210701_143138.jpg
लाडसावंगी येथील जानिमिया डोंगरावर दोन वर्षापुर्वी लावलेले वृक्ष असे वाढीस लागले आहे.