राज्यातील दोन आयएएस, एक अपर जिल्हाधिकारी नापास; सहा जण काठावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 08:56 AM2024-02-17T08:56:50+5:302024-02-17T08:57:17+5:30
सहा जण काठावर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतली परीक्षा
विकास राऊत
छत्रपती संभाजीनगर : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हाधिकारी (डीईओ/जिल्हा निवडणूक अधिकारी) व अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या (निर्णय अधिकारी) घेतलेल्या परीक्षेत दोन जिल्हाधिकारी व एक अपर जिल्हाधिकारी नापास, तर सहा अधिकारी काठावर पास झाले आहेत.
पाच बॅचमध्ये झाले होते प्रशिक्षण
२८ आयएएस अधिकारी आणि २० अपर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर दि. ५ ते २९ डिसेंबर २०२३ या कालावधीत पाच बॅचमध्ये घेण्यात आले.
त्या प्रमाणीकरण शिबिराचा निकाल दोन दिवसांपूर्वी लागला आहे. राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला केंद्रीय निवडणूक आयोगाने अपात्र अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे.
किती गुणांची परीक्षा?
n५० गुणांची होती परीक्षा
n३८ गुण मिळणे अपेक्षित होते.
n३८ ते ४० दरम्यान गुण ०६ अधिकाऱ्यांना
n४० ते ४५ दरम्यान गुण २३ अधिकाऱ्यांना
n४५ ते ५० दरम्यान गुण १६ अधिकाऱ्यांना
सांगली ३९
पुणे ४४
सोलापूर ४७
कोल्हापूर ४४
पुणे ४९
पुणे ५०
धाराशिव ४१
अहमदनगर ४८
ठाणे ४५
जळगाव ४६
नाशिक ४६
ठाणे ४५
मुंबई शहर ४७
मुंबई उपनगर ४०
ठाणे ४६
नागपूर ४३
मुंबई शहर ४३
मुंबई उपनगर ४६
मुंबई उपनगर ४५
मुंबई उपनगर ३७