अपघातात दोन ठार; दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:21 AM2017-09-25T00:21:47+5:302017-09-25T00:21:47+5:30
भरधाव दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन त्यात दोघे ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : भरधाव दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन त्यात दोघे ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीड शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ घडली.
धनंजय अशोक नांदलगावकर (३०, शाहूनगर, बीड) व परमेश्वर सोपान बहिर (रा.आहेरचिंचोली ता.केज) असे ठार झालेल्यांचे नाव आहे. परमेश्वर हा मित्रासोबत दुचाकीवरून (एमएच-२३ एए-६२६०) गावाकडे जात होता. तर धनंजय हा मित्रासोबत एका हॉटेलवर जेवण करून दुचाकीवरून (एमएच-२३ए-२३१५) बीडकडे परतत होता. या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली. यात चौघेही जखमी झाले होते. जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु उपचारादरम्यान धनंजयचा मृत्यू झाला, तर इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. परमेश्वरची प्रकृती चिंताजनक असून, त्याला औरंगाबादला हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या अपघाताची ठाण्यात नोंद झाली.