दोन लाख ३५ हजार शेतकऱ्यांना मिळाला कर्जमुक्तीचा लाभ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:02 AM2021-05-14T04:02:06+5:302021-05-14T04:02:06+5:30
कर्जवाटपासंबंधी माहिती देताना ते म्हणाले, खरीप पीक कर्जवाटपात औरंगाबाद जिल्हा मराठवाड्यात पहिल्या क्रमांकावर असून, एकूण ११४ टक्के कर्जवाटप ...
कर्जवाटपासंबंधी माहिती देताना ते म्हणाले, खरीप पीक कर्जवाटपात औरंगाबाद जिल्हा मराठवाड्यात पहिल्या क्रमांकावर असून, एकूण ११४ टक्के कर्जवाटप करण्यात आलेले आहे. २०२०-२१चे औरंगाबाद जिल्ह्याचे खरीप पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ११९७ कोटी रुपयांचे होते. प्रत्यक्षात १३६० कोटी रुपये इतके कर्जवाटप करण्यात आले व त्याचा लाभ २ लाख ६२ हजार ४७१ शेतकऱ्यांना झाला.
रब्बी कर्जवाटपातही २९९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना ५२० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. ही टक्केवारी १७४ टक्के इतकी आहे. ६८ हजार ८२४ शेतकऱ्यांना हे कर्जवाटप करण्यात आले. खरीप आणि रब्बी कर्जवाटपाचे २०२-२१ चे एकूण उद्दिष्ट चौदाशे ९६ कोटी रुपयांचे होते. प्रत्यक्षात १८८० कोटी रुपये म्हणजे १२० टक्के कर्जवाटप करण्यात आले. व त्याचा तीन लाख ३१ हजार २९५ शेतकऱ्यांना लाभ झाला, अशी माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली. त्यांनी आणखी सांगितले की, २०२१- २२चे खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट १२९३ कोटींचे असून, आतापर्यंत ३९,० १७ शेतकऱ्यांना १५९ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आलेले आहे. ही टक्केवारी १२.५ इतकी आहे. ७० टक्के शेतकऱ्यांना अद्याप कर्जवाटप व्हावयाचे आहे.