पुंडलिकनगर परिसरात दोन विद्यार्थिनींची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:51 PM2019-05-24T23:51:08+5:302019-05-24T23:51:45+5:30

शहरातील पुंडलिकनगर परिसरातील भारतनगर आणि पहाडे कॉर्नर येथील दोन विद्यार्थिनींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी समोर आले. यापैकी एक अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होती. दुसरी १६ वर्षीय मुलगी परभणी जिल्ह्यातील रहिवासी असून, उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त औरंगाबादेतील चुलत्याच्या घरी आली होती. दोन्ही मुलींच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Two-month-old girl suicides in Pundaliknagar area | पुंडलिकनगर परिसरात दोन विद्यार्थिनींची आत्महत्या

पुंडलिकनगर परिसरात दोन विद्यार्थिनींची आत्महत्या

googlenewsNext

औरंगाबाद : शहरातील पुंडलिकनगर परिसरातील भारतनगर आणि पहाडे कॉर्नर येथील दोन विद्यार्थिनींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी समोर आले. यापैकी एक अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होती. दुसरी १६ वर्षीय मुलगी परभणी जिल्ह्यातील रहिवासी असून, उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त औरंगाबादेतील चुलत्याच्या घरी आली होती. दोन्ही मुलींच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षातील गौरी सुशील खवसे (२३) हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुंडलिकनगर परिसरातील मधुराज अपार्टमेंटमध्ये घडली. याविषयी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी सांगितले की, गौरीने नुकतीच अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती. गेल्या काही दिवसांपासून मात्र ती भीती वाटते असे घरी सांगत असे. शिवाय तिच्यावर कोणीतरी पाळत ठेवते असे ती म्हणायची. गुरुवारी रात्री तिने नातेवाईकांसोबत जेवण केले आणि खोलीत जाऊन झोपली. रात्री कधी तरी तिने छताच्या लोखंडी हुकाला ओढणी बांधून गळफास घेतला. सकाळी सात वाजेच्या सुमारास हा प्रकार नजरेस पडल्यानंतर नातेवाईकांनी तिला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी गौरीला तपासून मृत घोषित के ले. सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. फरताळे तपास करीत आहेत.
-------------
चुलत्याच्या घरी पुतणीची आत्महत्या
औरंगाबाद : गारखेडा परिसरातील भारतनगर येथे चुलत्याच्या घरी आलेल्या पूनम अर्जुन वाघाळे (१६, रा. कोहेगाव, ता. सेलू, जि. परभणी) हिने गुरुवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी सांगितले की, पूनम ही परभणी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत होती. उन्हाळ्याच्या सुटीमध्ये ती १८ मे रोजी भारतनगर येथे तिच्या चुलत्याच्या घरी आली होती. गुरुवारी रात्री जेवण करून पूनम झोपली. रात्री तिने स्वयंपाक खोलीत ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. सकाळी सात वाजेच्या सुमारास स्वयंपाक खोलीचे दार आतून बंद असल्याने दार तोडण्यात आले तेव्हा पूनमने गळफास घेतल्याचे दिसले. नातेवाईकांनी पूनमला घाटीत दाखल केले. पुंडलिकनगर ठाण्यात याविषयी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

Web Title: Two-month-old girl suicides in Pundaliknagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.