अवजड वाहनांच्या फिटनेस तपासणीसाठी दोन महिन्यांची वेटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:11 PM2018-12-13T22:11:44+5:302018-12-13T22:12:35+5:30
अवजड वाहनांच्या फिटनेससाठी वाहनधारकांना दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
औरंगाबाद : अवजड वाहनांच्या फिटनेससाठी वाहनधारकांना दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी वाहनधारकांचे उत्पन्न बुडत आहे. यासंदर्भात औरंगाबाद गुड्स ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाºयांची भेट घेऊन फिटनेस यंत्रणा सुरळीत करण्याची मागणी केली.
आरटीओ कार्यालयातर्फे करोडी येथे वाहनांची फिटनेस (योग्यता प्रमाणपत्र) तपासणी केली जाते. त्यासाठी वाहनधारकांना अपॉइंटमेंट दिली जाते. आजघडीला ही अपॉइंटमेंट दोन महिन्यांवर गेली आहे. त्यामुळे वाहनधारकांना आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे. फिटनेसशिवाय वाहन रस्त्यावर चालविल्यास आरटीओ कार्यालय आणि पोलीस प्रशासनातर्फे कारवाई केली जाते. मोटार वाहन निरीक्षकांच्या अपुºया संख्येमुळे फिटनेससाठी प्रतीक्षा करण्याची वेळ वाहधारकांवर येत आहे. या सगळ्या प्रश्नांसंदर्भात औरंगाबाद गुड्स ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फय्याज खान यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांची भेट घेतली. यावेळी निवेदन देऊन फिटनेसची यंत्रणा सुरळीत करण्याची मागणी केली. आगामी आठवडाभरात ही यंत्रणा सुरळीत होईल आणि वाहनधारकांना अडचण येणार नाही, असे आश्वासन प्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी दिल्याची औरंगाबाद गुड्स ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने माहिती एका प्रसिद्धीपत्रक द्वारे दिली.