दोन महिने मृत्यूशी झुंज संपली; सिध्दार्थ उद्यानातील राजा बिबट्याची प्राणजोत मालवली

By मुजीब देवणीकर | Published: August 17, 2023 02:52 PM2023-08-17T14:52:07+5:302023-08-17T14:52:22+5:30

१५ वर्षीय राजा बिबट्या मागील दोन महिन्यापासून आजारी होता.

Two months of fighting to the death ended; The life of the Raja Leopard in Siddhartha Park | दोन महिने मृत्यूशी झुंज संपली; सिध्दार्थ उद्यानातील राजा बिबट्याची प्राणजोत मालवली

दोन महिने मृत्यूशी झुंज संपली; सिध्दार्थ उद्यानातील राजा बिबट्याची प्राणजोत मालवली

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका सिध्दार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील राजा बिबट्याचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. १५ वर्षीय राजा बिबट्या मागील दोन महिन्यापासून आजारी होता. गडचिरोली येथून आणण्यात आलेल्या राजा बिबट्याचा सिद्धार्थ उद्यानात मागील सात वर्षापासून वावर होता.

आजारी राजावर प्राणीसंग्रहालय पशुवैद्यक डॉ. निती सिंग उपचार करत होत्या. परंतु उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने बुधवारी रात्री राजाने अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी शवविच्छेदन डॉ. अमीतकुमार दुबे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, डॉ. रोहीत धुमाळ व डॉ. महेश पवार पशुधन विकास अधिकारी यांनी केले. अंत्यसंस्कारावेळी डी. बी. तौर वनपरिक्षेत्र अधिकारी व ए. डी. तांगड वन परिमंडल अधिकारी यांची उपस्थिती होती. 

गडचिरोली येथून आणण्यात आले होते
गडचिरोली जिल्ह्यातील आमटेज् अॅनिमल आर्क्स, हेमलकसा येथून २०१६ साली राजा बिबट्याला सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात आणण्यात आले होते. त्यावेळेस त्याचे वय अंदाजे ७ ते ८ वर्षे इतके होते. उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने अवयव निकामी होऊन राजा बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या प्र. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिली.

Web Title: Two months of fighting to the death ended; The life of the Raja Leopard in Siddhartha Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.