दावरवाडीत दोन पॅनेलची चुरशीची लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:04 AM2021-01-09T04:04:26+5:302021-01-09T04:04:26+5:30
मतदान रिंगणात शिवसेना पुरस्कृत शिवशाही ग्राम विकास पॅनेलने पाच प्रभागांत तेरा उमेदवार उभे केले आहेत, तर परिवर्तन ग्राम विकास ...
मतदान रिंगणात शिवसेना पुरस्कृत शिवशाही ग्राम विकास पॅनेलने पाच प्रभागांत तेरा उमेदवार उभे केले आहेत, तर परिवर्तन ग्राम विकास महाआघाडी पॅनेलनेदेखील आपले पाच प्रभागात तेरा उमेदवार मतदान रिंगणात उतरविले आहेत, तर एक महिला उमेदवार अपक्ष म्हणून आखाड्यात आहेत. यामुळे लढत चुरशीची होणार आहे. शिवशाही ग्राम विकास पॅनेलचे विद्यमान माजी सरपंच उत्तमराव खांडे, तर परिवर्तन ग्राम विकास महाविकास आघाडीचे माजी उपसरपंच चंद्रशेखर सरोदे, सोसायटीचे विद्यमान चेअरमन राजेंद्र वाघमोडे हे निवडणूक लढवीत आहेत.
गावात सुशीलाबाई औटी (वय ६७) या सर्वात जास्त वयाच्या उमेदवार आहे, तर प्रवीण खांडे हे गावातील सर्वांत कमी वयाचे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक १ मध्ये ज्ञानेश्वर जाधव व सीमा ज्ञानेश्वर जाधव हे पती-पत्नी नशीब आजमावत आहेत. दोन्ही पॅनेलने प्रचाराला जोरात सुरुवात केल्याने गावचे राजकारण ढवळून निघाले आहे.
फोटो : ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय दावरवाडीचा फोटो.