भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील २ तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:37 AM2018-03-05T00:37:04+5:302018-03-05T00:37:09+5:30

दुचाकीने घरी परताना पाठीमागून भरधाव वेगाने येणा-या चारचाकीने दुचाकीस दिलेल्या जबर धडकेत दोन जण जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता औरंगाबाद-जालना मार्गावर लाडगाव उड्डाण पुलाजवळ घडली.

Two people on the bike killed in a car crash | भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील २ तरुण ठार

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील २ तरुण ठार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
करमाड : दुचाकीने घरी परताना पाठीमागून भरधाव वेगाने येणा-या चारचाकीने दुचाकीस दिलेल्या जबर धडकेत दोन जण जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता औरंगाबाद-जालना मार्गावर लाडगाव उड्डाण पुलाजवळ घडली.
अमरुल्लाह गुलमोहंमद खान (२०, रा. कनवरगाव, जिल्हा सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश), कृष्णकुंज कुमार (२०, रा. पिपराकानुनगो, जिल्हा सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश, ह.मु. शंभूनगर, गारखेडा परिसर, औरंगाबाद) असे दुचाकीवरील मयत झालेल्यांची नावे आहेत. या अपघातानंतर या चारचाकी इंडिगो कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीलाही (क्र. एमएच २१ जे ३०९०) जोराची धडक देत तिचे मोठे नुकसान करीत दुभाजकावर जाऊन धडकली.
याबाबत अपघाताचे प्रत्यक्षदर्शी व फिर्यादी दुचाकीचे मालक संदीप शेजवळ (रा. कुंभेफळ ,ता. जि. औरंगाबाद) यांनी या अपघाताबाबत शनिवारी रात्री उशिरा फिर्याद दिली. या अपघाताबाबत करमाड पोलिसांनी घाटीतील नोंद घेत फिर्यादीच्या तक्रारीवरून इंडिगो कार (क्र. एमएच २० सीएस ७११३) या गाडीचा चालक चिमणीलाल पेंढारकर (रा. संजयनगर, औरंगाबाद) याच्याविरुद्ध वाहन भरधाव वेगाने चालवून दुस-याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
अपघाताबाबत करमाड पोलिसांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील दोन्ही तरुण पीओपीचे काम करणारे मजूर होते. दोघांचेही गाव उत्तर प्रदेशमध्ये अगदी जवळ जवळ असलेले हे तरुण कामाच्या शोधात मागील काही वर्षांपासून औरंगाबाद येथे शेजारी शेजारी राहतात. दरम्यान, सर्वत्र धूलिवंदन साजरा करीत असताना आज सुटी आहे, तर दुसरे काम शोधून तर ठेवूम्हणत ते अमरुल्लाहच्या दुचाकीवरून बाहेर पडले होते. ते घरी औरंगाबादकडे परत जात असताना कारने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. चारचाकीने बाजूला उभ्या असलेल्या दुचाकीस धडक देत ती दुभाजकात जाऊन अडकली.

Web Title: Two people on the bike killed in a car crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.