भीषण कार अपघातात दोन जण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:17 AM2017-10-23T01:17:56+5:302017-10-23T01:17:56+5:30
दोन कारमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले, तर इतर ६ जण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी वरझडी येथील जुन्या बसस्थानकासमोर घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
लासूर स्टेशन : दोन कारमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले, तर इतर ६ जण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजता औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील वरझडी येथील जुन्या बसस्थानकासमोर घडली. याप्रकरणी शिल्लेगाव ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
या अपघातातील मृतांमध्ये अमृता किशोर पडेलवार (रा. मुंबई), अबू इतेक अहेमद हुबेत (रा. अजमगड, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. या अपघातात सागर वसंत तुरे, सुमनबाई रंगनाथ शिरसाठ, वसंत बाळा तुरे, शोभा वसंत तुरे, इंदु बाळा तुरे (सर्व रा. कार्तिक नगर, औरंगाबाद), किशोर अशोक पडिलवार (रा. मुंबई) हे ६ जण जखमी झाले.
मुंबई येथील रहिवासी किशोर अशोक पडेलवार व अमृता किशोर पडेलवार हे दोघे चालक अबू इतेक अहेमद हुबेत याच्यासोबत कारमधून (क्र. एम.एच-०२ ईपी-४२४१) चंदीगडहून मुंबईकडे जात होते. तर सागर वसंत तुरे, सुमनबाई रंगनाथ शिरसाठ, वसंत बाळा तुरे, शोभा वसंत तुरे, इंदू बाळा तुरे (सर्व रा. कार्तिकनगर, औरंगाबाद). दुसºया कारमधून (क्र.एम.एच-१५ बी.एक्स-४८९) वैजापूरहून औरंगाबादकडे जात असताना रविवारी सकाळी ८ च्या सुमारास औरंगाबाद-नाशिक महामार्गावर दोन्ही कारची समोरासमोर धडक झाली. त्यात अमृता किशोर पडेलवार व अबू इतेक अहेमद हुबेत यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर ६ जण जखमी झाले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.