अहिंसानगरमधील हायफाय कुंटणखान्यावर गुन्हेशाखेची धाड, दोन जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 05:22 PM2017-10-25T17:22:30+5:302017-10-25T17:24:04+5:30
आकाशवाणी समोरील अहिंसानगरमध्ये सुरू असलेल्या उच्चभ्रू कुटंणखान्यावर गुन्हेशाखा पोलिसांनी मंगळवारी (दि.२४)रात्री छापा मारला. या छाप्यात दलालासह आंटीला अटक करून तेथे वेश्या व्यवसायासाठी मुंबईहून आणण्यात आलेल्या दोन तरूणींची मुक्तता केली.
औरंगाबाद : आकाशवाणी समोरील अहिंसानगरमध्ये सुरू असलेल्या उच्चभ्रू कुटंणखान्यावर गुन्हेशाखा पोलिसांनी मंगळवारी (दि.२४)रात्री छापा मारला. या छाप्यात दलालासह आंटीला अटक करून तेथे वेश्या व्यवसायासाठी मुंबईहून आणण्यात आलेल्या दोन तरूणींची मुक्तता केली. या कारवाईने अहिंसानगरात खळबळ उडाली.
प्रवीण बालाजी कुरकुटे (३५,रा. ज्योती प्राईड, सातारा परिसर) आणि आंटी यांचा आरोपीत समावेश आहे. याविषयी अधिक माहिती देताना गुन्हेशाखा पोलिसांनी सांगितले की, अहिंसानगरातील एका बंगल्यात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती खब-याने पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दिपाली धाटे-घाडगे आणि सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, उपनिरीक्षक नंदकुमार भंडारी,साईनाथ महाडिक, पोहेकाँ संतोष सोनवणे, फारूख देशमुख, विद्यानंद गवळी, शिवाजी भोसले,संजय जाधव, सिद्धाार्थ थोरात,ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड, नितीन धुळे, लालखाँ पठाण,योगेश गुप्ता, महिला कर्मचारी संजीवनी शिंदे चालक म्हस्के आणि कांबळे यांनी बनावट ग्राहक सदर बंगल्यात पाठविला. त्यावेळी आरोपी प्रवीण आणि आंटी त्यांना भेटले. यावेळी पोलिसांच्या बनावट ग्राहकांने त्यांच्याकडे वेश्यागमन करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा आरोपींनी दोन मुली त्याच्यासमोर उभ्या केल्या आणि एक हजार रुपये प्रती मुलगी असा दर सांगितला.
यानंतर पोलिसांना मिळालेली माहितीची खात्री पटताच खब-याने पोलिसांना फोन करून इशारा केला. यावर बंगल्याच्या परिसरात थांबलेल्या पोलिसांनी तेथे धाड मारली. यावेळी पोलिसांनी पंचासमक्ष बनावट ग्राहकांकडून आरोपींनी घेतलेली रक्कम जप्त, आरोपींचे मोबाईल जप्त केली. वेश्या व्यवसाय करून घेण्यासाठी तेथे मुंबईहून आणलेल्या दोन मुलींची मुक्तता केली. आरोपी प्रवीणला आणि आंटीला अटक केली.
मुंबईहून आणल्या दोन मुली
आरोपी प्रवीण आणि आंटी दोघेही अनेक दिवसापासून या व्यवसायात असल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आले. आंटीला पोलिसांनी यापूर्वी पकडले होते. तर प्रवीण हा प्रथमच पोलिसांच्या हाती लागला. त्यानेच मुंबईतील मालाड येथून मुली आणल्या होत्या. विशेष म्हणजे त्याने दोन्ही मुलींना उसने पैसे दिले होते. ही रक्कम फेडण्यासाठी त्यांनी त्यांना औरंगाबादेत बोलावून घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.