रुग्णालयात तोडफोड करणाऱ्या दोघांना कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:04 AM2021-03-18T04:04:36+5:302021-03-18T04:04:36+5:30

याबाबत वाळूज येथील नेहा हॉस्पिटमधील कम्पाउंडर संतोष कडुबा गांगुर्डे यांनी फिर्याद दिली होती की, ३ सप्टेंबर ...

Two sentenced to life in prison for vandalizing a hospital | रुग्णालयात तोडफोड करणाऱ्या दोघांना कारावासाची शिक्षा

रुग्णालयात तोडफोड करणाऱ्या दोघांना कारावासाची शिक्षा

googlenewsNext

याबाबत वाळूज येथील नेहा हॉस्पिटमधील कम्पाउंडर संतोष कडुबा गांगुर्डे यांनी फिर्याद दिली होती की, ३ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ९.३० ते १०.०० वाजेच्या सुमारास वरील दोन्ही आरोपी हॉस्पिटलमध्ये शिरले. त्यांनी हॉस्पिटलसमोर उभी केलेली दुचाकी चोरून नेल्याचा आरोप करीत हॉस्पिटलमधील एलसीडी टीव्ही, फर्निचरची मोडतोड करून हॉस्पिटलचे सुमारे ९० हजार रुपयाचे नुकसान केले, तसेच त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालीन जमादार के.टी. महाजन यांनी तपास करून आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदवले.

सुनावणीअंती दोन्ही बाजूंच्या युक्तिवाद व साक्षी-पुराव्यांवरून न्यायालयाने वरील दोघा आरोपींना दोषी ठरवून भा.दं.वि. कलम ५०४ आणि ५०६ अन्वये प्रत्येकी ६ महिने कारावास आणि महाराष्ट्र वैद्यकीय सेवा हिंसक कृत्य प्रतिबंधक अधिनियम २०१० च्या कलाम ४ नुसार प्रत्येकी ६ महिने कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला.

Web Title: Two sentenced to life in prison for vandalizing a hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.