धक्कादायक! पाळलेल्या बोक्याने घेतला दोन बहिणीला चावा
By साहेबराव हिवराळे | Published: July 5, 2023 09:45 PM2023-07-05T21:45:14+5:302023-07-05T21:45:35+5:30
पशुजन्य रोग दिवस नागरिकांमध्ये जनजागृती
छत्रपती संभाजीनगर: घरातील पाळतु मांजर, कुत्रा यावर बारकाईने लक्ष देणे तसेच प्राण्यापासून सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, परंतु आपण याकडे कानाडोळा करीत असल्याने स्वत:लाही जखमी होण्याचा व जीवावर बेतण्याचा गंभीर प्रकार शहरात समोर आला आहे. पाळतु बोक्याने दोन बहिनीवर हल्ला चढवून जखमी केल्याची घटना घडली. ६ जुलै पशुजन्य रोग दिवस नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.
आपल्या पाळीव प्राण्यांचे आरोग्य सांभाळावे कारण बरेचशा परिसरामधून मांजरीमध्ये बोक्या आक्रमक होऊन असा चावा घेतो व अशा घटना पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात घडतात, कारण पावसाळा ऋुतुमध्ये होते, यामध्ये सावधानी घरामध्ये खड्डे पाणी भरल्यामुळे साप बाहेर येता चावण्याची शक्यता कुत्रा, मांजर चावा घेतो यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे.
शहरात एका घरात पाळलेल्या बोक्याने घरातील कुटुंबातील दोन मुलींला चावा घेऊन जखमी केल्याच्या प्रकाराने त्या दोघींही घाबरल्या आहेत. पाळीव असलेला बोका आपल्यावर असा धावा कसा करू शकतो, या प्रश्नांची उत्तर त्यांना मिळाले नाही. पावसाळ्यात मांजर, कुत्रा हे प्राणी चावा घेण्याचे प्रकार अधिक असतात. जाणकारांचे म्हणणे आहे.
घरामध्ये पाळीव प्राण्यांपासूनही सतर्कता हवी...
लाईफ केअर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन संस्थेच्या वतीने शहरांमधील नागरिकांनी घरामध्ये पाळीव प्राण्यांपासूनही सतर्कता बाळगावी असे आवाहन केले जात आहे. घरातील नेहमीचा तुमचा पाळीव कुत्रा असो किंवा मांजर यांचं नियमित अँटी रेबीज व्हॅक्सिनेशन करून घ्यावे. पशुवैद्यकीयाकडे नेवून औषधोपचार करणे तपासणी करणे आवश्यक आहे. कारण पुढे उद्भवणारे गंभीर आजारापासून आपण वाचू शकतो.
- जयेश शिंदे, सचिव - लाईफ केअर संस्थ