दोन शिक्षकांना दणका
By Admin | Published: March 5, 2017 12:16 AM2017-03-05T00:16:08+5:302017-03-05T00:19:39+5:30
ब्ाीड : बारावी परीक्षेमध्ये केंद्रावर खुलेआम कॉप्या आढळल्यामुळे दोन शिक्षकांना तडकाफडकी परीक्षा कामकाजातून कार्यमुक्त करण्यात आले.
ब्ाीड : बारावी परीक्षेमध्ये केंद्रावर खुलेआम कॉप्या आढळल्यामुळे दोन शिक्षकांना तडकाफडकी परीक्षा कामकाजातून कार्यमुक्त करण्यात आले. ही कारवाई शनिवारी मादळमोही येथे झाली. दिवसभरात २९ परीक्षार्थ्यांना कॉप्या करताना पकडले.
गेवराईचे तहसीलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी मादळमोही येथे नवीन कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्राला भेट दिली. मोठ्या प्रमाणात कॉप्या आढळून आल्या. यावेळी ४ परीक्षार्थ्यांना निलंबित करण्यात आले, तर केंद्रावरील शिक्षक सुरेश उत्तम तळेकर व सुरेश प्रभाकर सानप यांना परीक्षा कामकाजातून मुक्त करण्यात आले. सकाळी चिटणीसांची कार्यपद्धती तर दुपारच्या सत्रात भौतिकशास्त्र विषयाचा पेपर होता. तहसीलदार बिरादार यांनी जय भवानी व आर. बी. अट्टल महाविद्यालयातील प्रत्येकी दोघांना कॉप्या करताना पकडले. शिक्षणाधिकारी (मा.) विक्रम सारूक यांनी शिवणी केंद्रावर ११, वडवणी येथे ७ जणांना रेस्टीकेट केले. धानोरा येथे विस्तार अधिकारी मनोज धस यांनी दोघांवर कारवाई केली. बनसारोळ्यात एक कॉपी बहाद्दर पकडला. (प्रतिनिधी)