वाळूज पोलीस ठाण्यात हद्दीत भाडेकरू नोंदीसाठी दोन हजारांचे शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 09:13 PM2018-12-07T21:13:44+5:302018-12-07T21:14:04+5:30

वाळूज पोलीस ठाण्यात हद्दीतील भाडेकरुंची नोंद घेण्यासाठी घरमालकांना दोन हजार रुपयांचे शुल्क आकारले जात आहे.

 Two thousand charges for rental records in the sand city police station | वाळूज पोलीस ठाण्यात हद्दीत भाडेकरू नोंदीसाठी दोन हजारांचे शुल्क

वाळूज पोलीस ठाण्यात हद्दीत भाडेकरू नोंदीसाठी दोन हजारांचे शुल्क

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूज पोलीस ठाण्यात हद्दीतील भाडेकरुंची नोंद घेण्यासाठी घरमालकांना दोन हजार रुपयांचे शुल्क आकारले जात आहे. यासाठी नाशिकच्या एका एजन्सीसोबत पोलिसांनी करार केला आहे. वाळूज पोलीस ठाण्यात या एजन्सीकडून शिबिर घेऊन नोंदणी शुल्क घेतले जात असल्याची तक्रार घरमालकांसह नागरिकातून केली जात आहे.


वाळूज उद्योगनगरीत देशाच्या विविध भागांतून आलेले कामगार या परिसरात भाडेतत्त्वावर राहतात. याशिवाय विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले गुंड प्रवृत्तीच्या फरार व्यक्ती उद्योगनगरीत आश्रय घेत असतात. या भागात भाडेतत्त्वावर राहून गुन्हेगारी कारवायात सहभागी झालेल्या या भाडेकरूचा शोध लागत नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. मध्यंतरी वाळूज महानगरात दुचाकी व चारचाकी वाहने जाळण्याचे प्रकार सुरूहोते.

त्यामुळे पोलिसांनी भाडेकरूची माहिती गोळा करण्याचे काम सुरूकेले होते. आजघडीला एमआयडीसी व वाळूज पोलीस ठाण्याच्या वतीने घरमालकांकडून भाडेकरूची माहिती संकलित केली जात आहे. वर्षभरात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात जवळपास ३०० भाडेकरूंची माहिती घेण्यात आली आहे. वाळूज पोलिसांच्या वतीने पंधरा दिवसांपूर्वी गावात जनजागृती करून भाडेकरूची नोंद करण्याचे आवाहन केले होते.


मुदतीत भाडेकरूची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा वाळूज पोलिसांनी दिला होता. त्यामुळे अनेक घरमालक भाडेकरूच्या नोंदणीसाठी ठाण्यात गेले. यावेळी घरमालकाला प्रत्येकी दोन हजार रुपये शुल्क आकारले. याचे काम नाशिकच्या अन्टीलोप कॉर्पोरेशन प्रा.लि. या एजन्सीला दिले आहे. संबंधित एजन्सीकडून आकारले जाणारे शुल्क जास्त असल्याची ओरड घरमालकांतून होत आहे.

अन्टीलोप कंपनी व पोलीस आयुक्तालयात करार
नाशिक येथील अन्टीलोप कॉर्पोरेशन प्रा.लि.चे संचालक कैलास राजपूत म्हणाले की, पोलीस आयुक्त कार्यालयासोबत २७ आॅगस्ट रोजी करार झाला आहे. या करारावर सायबर सेलचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांची स्वाक्षरी आहे. या करारानुसार दोन हजार रुपये शुल्क भरणाºया घरमालकांना लाईफ-टाईम सुविधा पुरविली जाणार असून, भाडेकरूची माहिती देण्यासाठी त्यांना वारंवार पोलीस ठाण्यात येण्यापासून सुटका होणार आहे. एजन्सीकडून घरमालकांना एक सॉफ्टवेअर दिले जाणार असून, विविध सूचना व इतर माहिती दिली जाणार आहे. १६८ पैकी १३८ घरमालकांनी शुल्क भरले आहे. या सॉफ्टवेअरमुळे भाडेकरूंची सर्व माहिती पोलिसांना मिळणार असल्याने गंभीर घटना घडल्यास आरोपींचा शोध लागण्यास मदत होणार असल्याचे राजपूत यांनी सांगितले.
एमआयडीसी ठाण्यात मोफत नोंदणी
वाळूज पोलीस ठाण्यात भाडेकरूची नोंदणी शुल्क घेऊन केली जात आहे. या उलट लगतच्या एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात भाडेकरूची मोफत नोंद केली जात असल्याने घरमालकांत संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. या संबंधी तक्रार केल्यास पोलीस त्रास देतील या भीतीमुळे तक्रार करण्यास कुणीही पुढे येत नसल्याचे काही घरमालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतशी बोलताना सांगितले.
वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाºया घरमालकांकडून भाडेकरू नोंदणीसाठी दोन हजार रुपये शुल्क घेण्यात येत आहे. याचे काम नाशिकच्या अन्टीलोप कॉर्पोरेशन प्रा.लि. या एजन्सीला देण्यात आले आहे.
- सतीशकुमार टाक, पोलीस निरीक्षक,
वाळूज पोलीस ठाणे

घरमालकावर सक्ती नको
वाळूज पोलीस ठाण्यात भाडेकरुची नोंदणी करण्यासाठी दोन हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाने घरमालकांवर सक्ती न करता नोंदणीसाठी नाममात्र शुल्क आकारावे, यासाठी पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे अविनाश गायकवाड यांनी सांगितले
मोफत नोंदणी करावी
वाळूज औद्योगिकनगरीत रोजगारांच्या शोधात आलेले अनेक कामगार गावात भाडेतत्त्वावर राहतात. भाडेकरु नोंदणीसाठी शुल्क आकारल्यामुळे घरमालक घरभाड्यात वाढ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही नोंदणी मोफत नोंदणी करण्याची गरज सचिन काकडे यांनी व्यक्त केली.

Web Title:  Two thousand charges for rental records in the sand city police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.