तडा गेलेल्या रुळावरून दोन रेल्वे गेल्या; वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली, प्रवासी बालंबाल बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 08:19 PM2022-06-13T20:19:25+5:302022-06-14T11:31:40+5:30

जोडावरची वेल्डिंग तुटल्यामुळे घडली घटना, तातडीने तासाभरात दुरुस्ती करण्यात आली

Two trains runs on track, safe due to the low speed, a major accident was averted and the passengers were rescued | तडा गेलेल्या रुळावरून दोन रेल्वे गेल्या; वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली, प्रवासी बालंबाल बचावले

तडा गेलेल्या रुळावरून दोन रेल्वे गेल्या; वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली, प्रवासी बालंबाल बचावले

googlenewsNext

ir="ltr">औरंगाबाद : मुख्य रेल्वेस्थानकातून मुकुंदवाडीच्या दिशेने जाणारी रेल्वे राजनगर येथील तडा गेलेल्या रुळावर गेल्याचा प्रकार सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आला. त्यानंतर तात्काळ दुरुस्ती पथकाने घटनास्थळी धाव घेत तासाभरात पुन्हा वेल्डिंगचा मजबुत जोड दिला. तसेच निखळलेल्या क्लिपा जोडल्या. या घटनेत रुळावरुन जाणाऱ्या रेल्वेची गती आवघ्या २० वर होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळून रेल्वे प्रवासी बालंबाल बचावल्याचे पुढे आले आहे.

उन्हाळ्यामध्ये रेल्वेचे रुळ हे प्रसरण पावत असतात. त्यांची लांबी-रुंदी वाढत असते. हे सर्व उन्हामुळे घडते. गरम झालेल्या पटरीवरुन वजनदार रेल्वे गेल्यामुळे हा प्रकार होतो. पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर रेल्वे पटरीच्या खाली असलेला पायटा माती दबल्यास त्याठिकाणी पम्पिंग होते. अशा ठिकाणाहुन रेल्वे गेल्यामुळे रुळाच्या मध्यभागालाही क्रॅक जाण्याची शक्यता अधिक असते. त्याच पद्धतीचा प्रकार रविवारी सकाळी मुकुंदवडी ते चिकलठाणा रेल्वेस्थानकादरम्यान राजनगर येथे घटना घडली.

जनशताब्दी एक्सप्रेस रुळावरुन गेल्यानंतर त्या गाडीच्या चालकाला रुळावर मोठा आवाज झाल्याचे कळले. त्यामुळे त्या चालकांने तात्काळ माहिती रेल्वे विभागाला कळविली. या रेल्वेच्या नंतर आलेली मराठवाडा एक्सप्रेस गाडीही क्रॅक गेलेल्या रुळावरुनच गेली. या गाडीचा वेग अतिशय कमी होता. त्यामुळे रेल्वे रुळ बाजूला सरकले नाहीत. अन्यथा वेगात गाडी असती तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी शक्यता रेल्वेच्या सूत्रांनी दिली. मराठवाडा एक्सप्रेस गाडी क्रॅक झालेल्या रुळावरुन गेल्यानंतर रेल्वेच्या अभियंत्रिकी विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहचले. या पथकाने सुरुवातीला क्लॅम पट्टी लावली. त्यानंतर काही वेळातच रुळाला वेल्डिंगने जोडून घेत दुरुस्ती केली. यानंतर काही वेळातच रुळावरुन रेल्वे गेल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.

चालकाने दिली कल्पना
जनशताब्दी एक्सप्रेस गाडी रेल्वे रुळावरुन गेल्यानंतर मोठा आवाज झाल्याची माहिती चालकाने दिल्यामुळे पुढील घटनांची दुर्घटना टळली आहे. हा सर्व प्रकार रेल्वे विभागासाठी रुटीनचाच प्रकार असल्याचेही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Two trains runs on track, safe due to the low speed, a major accident was averted and the passengers were rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.