दोन ट्रॅव्हल्स खाक
By Admin | Published: March 11, 2017 12:09 AM2017-03-11T00:09:12+5:302017-03-11T00:09:43+5:30
बीड : दुरूस्तीचे काम सुरू असताना वेल्डिंगची ठिणगी पडल्यामुळे एका ट्रॅव्हल्स बसला आग लागली.
बीड : दुरूस्तीचे काम सुरू असताना वेल्डिंगची ठिणगी पडल्यामुळे एका ट्रॅव्हल्स बसला आग लागली. त्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केले. शेजारी उभी असलेली नादुरूस्त ट्रॅव्हल्स बसही आगीत सापडली. दोन्ही वाहने जळून खाक झाली. यात ३५ लाखांहून अधिक नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी रामनगर येथे घडली.
एमएच २३ / २००७ ही ट्रॅव्हल्स् दुरूस्ती कामासाठी रामनगर येथील सागर गॅरेजमध्ये लावण्यात आली होती. शुक्रवारी सकाळपासून दुरूस्तीचे काम सुरू होते. सायंकाळी पाच वाजता वेल्डिंग करताना ठिणगी उडाल्या. यातील एक ठिणगी प्रवाशी बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कुशनवर पडली. त्यानंतर ट्रॅव्हल्सने पेट घेतला. कुशनमुळे आग एवढ्या वेगाने पसरली की कामगारांनी जिवाच्या आकांताने तेथून सुरक्षित ठिकाणी पळ काढला. यावेळी या ट्रॅव्हल्सजवळ एमएच २३ जे ५७५७ ही दुसरी ट्रॅव्हल्स उभी होती. तिच्या दुरूस्तीचे काम शिल्लक होते. आगीचे लोट शेजारच्या ट्रॅव्हल्सजवळ पोहचले. त्यामुळे तिनेही पेट घेतला. दोन्ही ट्रॅव्हल्स यामध्ये भस्मसात झाल्या. गॅरेजसमोरून धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जातो. या ज्वाला महामार्गापर्यंत पोहोचल्या. त्यामुळे वाहतूक अर्धा तास रोखून धरण्यात आली. यावेळी नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेगाने फैलावलेल्या आगीपुढे निभाव लागला नाही. (प्रतिनिधी)