दोन अपघातांत तिघे जागीच ठार

By Admin | Published: June 10, 2014 12:14 AM2014-06-10T00:14:01+5:302014-06-10T00:55:23+5:30

उस्मानाबाद/उमरगा : लग्झरी बसने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला़ हा अपघात शनिवारी रात्रीच्या सुमारास कोल्हेगाव (ता़उस्मानाबाद) शिवारातील मार्गावर घडला.

Two of the two accidents killed on the spot | दोन अपघातांत तिघे जागीच ठार

दोन अपघातांत तिघे जागीच ठार

googlenewsNext

उस्मानाबाद/उमरगा : लग्झरी बसने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला़ हा अपघात शनिवारी रात्रीच्या सुमारास कोल्हेगाव (ता़उस्मानाबाद) शिवारातील मार्गावर घडला. याप्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या अपघातात उमरगा तालुक्यातील येळी गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सायंकाळी बस-ट्रकची समोरासमोर धडक होवून ट्रकचा चालक जागीच ठार झाला. यात बसमधील चार प्रवाशी जखमी झाले़
ढोराळा (ताक़ळंब) येथील राजेंद्र रामभाऊ चौधरी (वय-४३) व नारायण रघूनाथ दिवाणे (रा़शेलगा दिवाणे) हे दोघे रविवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५- वाय़ ७०५७) ढोकी येथून ढोराळाकडे जात होते़ कोल्हेगाव शिवारातील मार्गावरून आलेल्या खासगी लग्झरी बसने दुचाकीस जोराची धडक दिली़ या अपघातात राजेंद्र चौधरी, नारायण दिवाणे यांचा जागीच मृत्यू झाला़ अपघातानंतर बसचा चालक फरार झाला असून, या प्रकरणी दिलीप चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लग्झरी चालकाविरूध्द ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा अधिक तपास हेकॉ शेख हे करीत आहेत़
उमरगा तालुक्यातील येळी गावानजीक सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हैद्राबादहून धुळ्याकडे ट्रक (क्रक़े़ए़३९-३२७२) हा जात होता़ तालुक्यातील येळी गावानजीक या ट्रकला सोलापूरहून हैद्राबादकडे जाणाऱ्या बारामती-हैद्राबाद बसने (क्ऱएम़एच़९६-जी़८४३७) समोरून जोराची धडक दिली़ या अपघातात ट्रकचा चालक महंमद सैलानी शब्बीर पटेल (वय - ३५ रा़उमापूर जि़बिदर कर्नाटक) हा जागीच ठार तर बसमधील चौघे जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ या घटनेचा अधिक तपास पोहेका श्रीनिवास आरदवाड करीत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Two of the two accidents killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.