दोन भोंग्यांच्या दोन तऱ्हा; एकातून ‘मतदान’ करण्याचे आवाहन, दुसऱ्यातून ‘उमेदवारांचा प्रचार’

By साहेबराव हिवराळे | Published: November 15, 2024 12:40 PM2024-11-15T12:40:48+5:302024-11-15T12:41:31+5:30

उमेदवारांचा आधुनिक प्रचार आणि प्रशासनाच्या पोलिंग चीट वाटण्यासह असलेल्या ‘सोशल मीडिया’वर जरी भिस्त असली तरी या भोंग्यांची चर्चा अधिक आहे.

Two types of two bhongas; Calling for 'voting' from one, 'campaign of candidates' from the other | दोन भोंग्यांच्या दोन तऱ्हा; एकातून ‘मतदान’ करण्याचे आवाहन, दुसऱ्यातून ‘उमेदवारांचा प्रचार’

दोन भोंग्यांच्या दोन तऱ्हा; एकातून ‘मतदान’ करण्याचे आवाहन, दुसऱ्यातून ‘उमेदवारांचा प्रचार’

छत्रपती संभाजीनगर : शहरातील तीन मतदारसंघांत सध्या चर्चा आहे ती दोन प्रकारच्या भोंग्यांची. हे दोन्ही प्रकारचे भोंगे सध्या ‘मतदान’ करा असेच सांगत आहे. ही दोन्ही भोंगे सायकल रिक्षा, रिक्षा किंवा प्रशासकीय पातळीवर मतदान वाढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी केलेल्या पथनाट्य, प्रभातफेरी किंवा मतासाठी जनजागृतीचे आहेत, हे विशेष. या सर्व प्रयत्नांत भोंगे अतिशय उपयोगी पडत आहेत. पूर्व, मध्य, पश्चिमसह जिल्ह्यांतील नऊ विधानसभा मतदारसंघांत जनजागृती होताना दिसत आहे. 

उमेदवारांचा आधुनिक प्रचार आणि प्रशासनाच्या पोलिंग चीट वाटण्यासह असलेल्या ‘सोशल मीडिया’वर जरी भिस्त असली तरी या भोंग्यांची चर्चा अधिक आहे. साधारण वाटणाऱ्या या भोंग्यांनी सध्या प्रचारात व प्रशासकीय पातळीवरील मतदान वाढवण्याच्या मोहिमेत रंगत आणली आहे. दोन्ही प्रकारच्या या भोंग्यांमुळे अनेकांना काही दिवस रोजगार संधीही मिळाली आहे हे नाकारून चालणार नाही.

उमेदवारांच्या रिक्षा सायकलवरील भोंगा
- गल्लोगल्ली आवाज देऊन मतदान ‘मला’च करा सांगत आहे.
- रॅलीतही भोंग्याच्या आवाजामुळेच गर्दी होत आहे.
- द्वारभेटीदरम्यान पत्रक, स्टीकर वाटताना वॉर्डा-वॉर्डात याचा उपयोग होत आहे.
- कार्यकर्त्यांचे या भोंग्याच्या खाली एकत्रिकरण होत आहे. त्यांनाही उत्साह येत आहे.
- उमेदवारांच्या कॉर्नर सभांपूर्वी रंगत आणण्यासाठी याचा उपयोग होत आहे.
-कामगार वस्ती, शाळा, महाविद्यालय, विविध सोसायट्या,विविध कॉलनी येथे या रिक्षा जाऊन पोहोचत आहेत.

प्रशासकीयदृष्ट्या उपयोग कसा होत आहे? 
- यंदाच्या निवडणुकीत विभागाीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदान जागृतीसाठी नागरिकांना आवाहन करण्याच्या मोहिमेला अधिक सजगपणे राबवले जात आहे.
-पथनाट्य, प्रभात फेरी, मतदान जागृती फेरी अशा विविध माध्यमांतून प्रशासन प्रयत्न करत आहे.

Web Title: Two types of two bhongas; Calling for 'voting' from one, 'campaign of candidates' from the other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.