वळण रस्त्यावर भरधाव दुचाकी समोरासमोर धडकल्या; दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 04:38 PM2020-10-14T16:38:28+5:302020-10-14T16:43:03+5:30
Accident at Soyagaon इतर तीन जण जखमी असून त्यांच्यावर पाचोरा (जि जळगाव) येथे उपचार सुरु आहेत.
सोयगाव : सोयगाव- चाळीसगाव मार्गावर बनोटी (ता.सोयगाव) जवळील वळणावर दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.१४) सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात इतर तीन जण जखमी असून त्यांच्यावर पाचोरा (जि जळगाव) येथे उपचार सुरु आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेवरी (ता. चाळीसगाव) येथील चंद्रकात बद्री फणशे (३५) हे पत्नी अरुणा (३०) आणि मुलगा कार्तिक (५) यांच्यासह दुचाकीवरून ( एमएच १९एएस ०६४७ ) बनोटी येथील नातेवाईकाच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी येत होते. तर बनोटी येथील बन्सी हरचंद चौधरी (४०) आणि संदीप चंपालाल चौधरी (३२) हे दोघे दुचाकीवरून (एमएच १९ एके ०७०१) नागदकडे कामानिमित्त जात होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास बनोटी गावापासून काही अंतरावर असलेल्या वळणावर वेगात असणाऱ्या दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्या.
रेल्वेचे तीन डबे अनकपलिंग झाल्याने मागेच राहिले. https://t.co/VO4Vd4C1KT
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) October 14, 2020
अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. अपघाताचा जोरात आवाज झाल्याने आसपासचे शेतकरी तसेच काही ग्रामस्थांनी घानास्थाली धाव घेतली. उपसरपंच सागर खैरनार, स्वप्नील सोनवणे यांनी बनोटी येथील काही युवकांच्या मदतीने जखमी पाचही जणांना बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पाचोरा (जि जळगाव) येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे बन्सी हरचंद चौधरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पाच वर्षीय कार्तिकचा जळगाव येथील खाजगी दवाखान्यात नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला. अपघातात जखमी इतर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाली बनोटी पोलीस चौकीचे कॉन्स्टेबल सुभाष पवार, विकास दुबेले यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे..
रस्त्याच्या दुतर्फा गवत, झुडपे वाढल्याने अपघातात वाढ
राज्य रस्ता क्रं.२४ सोयगाव- चाळीसगाव रस्त्याच्या दुर्तफा गवत आणि झुडपांची मोठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे बनोटी जवळील वळण रत्यावर समोरुन येणार्या वाहनांचा अंदाज चालकांना येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी बहुलखेडा गावाजवळ अशाच अपघातात एका जणाला प्राण गमवावे लागले आहेत.
पोटच्या गोळ्यासारखी जपलेली सोयाबिन बनिम त्याने दोरी आणि कपड्याच्या सहाय्याने पाण्यातुन ओढत बाहेर काढली. https://t.co/wXpnpCmrjI
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) October 14, 2020