टॅंकरच्या धडकेत दुचाकीस्वार मित्रांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:04 AM2021-05-12T04:04:02+5:302021-05-12T04:04:02+5:30

फुलंब्री : सिल्लोड महामार्गावर टँकर-दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वार दोन तरुण मित्रांचा जागेवरच मृत्यू झाला. मंगळ‌वारी दुपारी ३ वाजेच्या ...

Two-wheeler friend killed in tanker collision | टॅंकरच्या धडकेत दुचाकीस्वार मित्रांचा मृत्यू

टॅंकरच्या धडकेत दुचाकीस्वार मित्रांचा मृत्यू

googlenewsNext

फुलंब्री : सिल्लोड महामार्गावर टँकर-दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वार दोन तरुण मित्रांचा जागेवरच मृत्यू झाला. मंगळ‌वारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा अपघात फुलंब्री शहरापासून काही अंतरावर घडला. शेख अस्लम शेख अहेमद (२४), सलीम पठाण रफिक पठाण (दोघेही रा. भावसिंगपूरा, औरंगाबाद) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

औरंगाबाद येथून मंगळवारी सकाळीच शेख अस्लम व सलीम पठाण हे दोघे मित्र दुचाकी (क्र. एमएच २० एफएफ ८७९४) वरून सिल्लोडला गेले होते. येथील काम आटोपल्यानंतर ते पुन्हा दुपारच्या वेळी औरंगाबादकडे निघाले. दरम्यान फुलंब्रीकडून सिल्लोडकडे जात असलेल्या टँकरने (क्र. एमएच १७ बीवाय ८७८७) दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतक्या जोराची होती की, दुचाकीस्वार अस्लम व सलीम हे दोघेही जागेवर ठार झाले. फुलंब्री पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात पाठविले. यासंबंधी टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. पोलीस निरीक्षक अशोक मुद्दीराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमारे हे पुढील तपास करीत आहेत.

कुटुंबियांवर शोककळा

अपघातात ठार झालेले शेख अस्लम शेख अहमद हा पेंटर व्यवसाय करतो. तर सलीम पठाण हा रिक्षाचालक आहे. दोघेही लहानपणापासूनचे सवंगडी आहेत. दोघेही विवाहित असून शेख अस्लम यांना एक व सलीम पठाण यांना दोन अपत्य आहे. दोघांचाही अपघातात मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांसह भावसिंगपुऱ्यात शोककळा पसरली आहे.

फोटो :

१ ] फुलंब्री नजीक झालेल्या अपघातातील टँकर.

२ ] मयत शेख अस्लम

३ ] सलीम पठाण

Web Title: Two-wheeler friend killed in tanker collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.