दोन दुचाकीचोर जेरबंद
By Admin | Published: June 30, 2016 12:56 AM2016-06-30T00:56:27+5:302016-06-30T01:25:28+5:30
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरातून दुचाकी लांबविणाऱ्या दोघा भामट्यांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरातून दुचाकी लांबविणाऱ्या दोघा भामट्यांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
रमेश मतकर यांची दुचाकी (क्रमांक एम.एच.-२०, सी.ए.९८१०) गेल्या महिन्यात चोरीस गेली होती. मतकर यांनी एमआयडीसी वाळूज ठाण्यात तक्रार दिली होती.
२८ जून रोजी एमआयडीसी वाळूज ठाण्याच्या डीबी शाखेचे फौजदार अमोल देशमुख, पोहेकॉ. वसंत शेळके, पोना बी.यु.बोडखे, पोकॉ. योगेश कुलकर्णी, संतोष जाधव, रविकुमार सूर्यवंशी गस्त घालत असताना जोगेश्वरी परिसरात एक संशयित तरुण दुचाकीवरून फिरत असताना दिसला.
त्याच्या जवळच्या दुचाकीच्या कागदपत्रांची चौकशी केली असता तो गोंधळला. त्या संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव नकुल वैद्य (रा. सुंदर कॉलनी, जोगेश्वरी) असल्याचे सांगत आपण आपला साथीदार सुरेश म्हस्के (रा.जोगेश्वरी) याच्या मदतीने वाळूज एमआयडीसी परिसरात आणखी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी जोगेश्वरीत सापळा रचून सुरेशलाही अटक केली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या दोघा आरोपींनी पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी बजाजनगर, रांजणगाव, जोगेश्वरी, सिडको वाळूज महानगर या परिसरातून पाच दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. या चोरांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.