ज्वलनक्षम केमिकल्स भरलेल्या मिनीडोअरसह दोन दुचाकी आगीत भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:04 AM2021-01-21T04:04:51+5:302021-01-21T04:04:51+5:30

: करमाड : फायबर डोअर्स बनविण्यासाठी आवश्यक असलेले ज्वलनशील केमिकल्स भरून आणलेल्या ॲपेरिक्षास लागलेल्या आगीत ॲपे रिक्षासह दोन दुचाकी ...

A two-wheeler with a minidoor filled with flammable chemicals caught fire | ज्वलनक्षम केमिकल्स भरलेल्या मिनीडोअरसह दोन दुचाकी आगीत भस्मसात

ज्वलनक्षम केमिकल्स भरलेल्या मिनीडोअरसह दोन दुचाकी आगीत भस्मसात

googlenewsNext

: करमाड : फायबर डोअर्स बनविण्यासाठी आवश्यक असलेले ज्वलनशील केमिकल्स भरून आणलेल्या ॲपेरिक्षास लागलेल्या आगीत ॲपे रिक्षासह दोन दुचाकी आगीत पूर्णपणे खाक झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास शेंद्रा एमआयडीसीमधील 'ए' सेक्टरमध्ये घडली.

शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सेक्टर 'ए'मधील जय भवानी ह्या फायबर डोअर बनविणाऱ्या कंपनीत रेग्झिन नावाच्या केमिकल्सची गरज असते. हे ज्वलनशील केमिकल्स घेऊन सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक ॲपेरिक्षा (एमएच १७ बीवाय ५९२३) या कंपनीत आला होता. उतरून घेण्यास वेळ असल्याने ही गाडी कंपनीसमोरील मुख्य रस्त्यावरच उभी होती. सायंकाळी सहा-सव्वासहा वाजेच्या सुमारास मिनीडोअर चालक गाडी कंपनीच्या आत घेत असतानाच गाडीच्या केबीनमधील वायरमध्ये अचानक शाॅर्टसर्किट होऊन धूर निघाला. दरम्यान, रिक्षात असलेल्या केमिकल्समुळे काही कळायच्या आतच आगीचा भडका उडाला व या आगीने रिक्षालगत उभ्या असलेल्या दोन दुचाकींनाही आपल्या कवेत घेतले.

शेंद्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेत दोन बंबांनी ही आग आटोक्यात आणली. तोपर्यंत तीनही वाहने जळून खाक झाली होती. यासाठी विभागीय अग्निशमन अधिकारी भरत कापसे यांच्या मार्गदर्शनात उपअग्निशमन अधिकारी दिलीप माने, प्रमुख अग्निशमन विमोचक संदीप पाटील, मधुकर टालोत, डी. एस. सोनवणे, प्रशांत कातकडे आदींनी ही आग आटोक्यात आणली.

कॅप्शन : शेंद्रा एमआयडीसीत आगीच्या घटनेत पूर्णपणे जळालेली रिक्षा.

Web Title: A two-wheeler with a minidoor filled with flammable chemicals caught fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.