वाळूज एमआयडीसीतील अपघातात दुचाकीस्वार ठार, सोबती गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 07:46 PM2021-06-21T19:46:35+5:302021-06-21T19:47:00+5:30
स्टरलाइट कंपनीसमोर मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास दुचाकीचा अपघात होऊन दोघे गंभीर जखमी झाले.
वाळूज महानगर : रस्ता अपघातात गंभीर जखमी होऊन दुचाकीस्वार ठार, तर त्यांचा सोबती गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.२०) मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसीतील स्टरलाइट कंपनीसमोर घडली. या अपघातात पंढरी माणिक गवई (२३, रा. नेहरूनगर, रांजणगाव) हा ठार झाला असून, त्यांचासोबत असलेले अनिल संजय वाघमारे (२२, रा. सातारा परिसर) हे गंभीर जखमी झाले.
पंढरी गवई हे सेंट्रिंगचे काम करतात. रविवारी (दि.२०) सकाळी ते दुचाकीने(एम.एच.२०, एफ.व्ही.२९९६) पडेगाव येथे कामाला गेले. सुटी झाल्यानंतर पंढरी व त्यांंचा मित्र अनिल हे दोघे रात्री दुचाकीने पंढरपूरमार्गे रांजणगावाकडे चालले होते. स्टरलाइट कंपनीसमोर मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास दुचाकीचा अपघात होऊन दोघे गंभीर जखमी झाले. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून पंढरी गवई यास मृत घोषित केले. गंभीर जखमी अनिल वाघमारे यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. वाघमारे हे जबाब देण्याच्या स्थितीत नसल्यामुळे नेमका अपघात कसा घडला याविषयी गूढ कायम आहे. पोहेकॉ. महाजन हे तपास करीत आहेत.