दुचाकीस्वार कामगारास आडवून बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:05 AM2020-12-30T04:05:26+5:302020-12-30T04:05:26+5:30
वाळूज महानगर : मोबाइल न देणाऱ्या कामगाराच्या दुचाकीसमोर मोपेड आडवी लावून तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.२८) ...
वाळूज महानगर : मोबाइल न देणाऱ्या कामगाराच्या दुचाकीसमोर मोपेड आडवी लावून तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.२८) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वाळूज उद्योगनगरीत घडली. या मारहाणीनंतर हल्लेखोर मोपेड सोडून घटनास्थळावरून फरार झाले.
सचिन सुभाष गवळी (२८, रा. नारळीबाग, औरंगाबाद) हे वाळूज एमआयडीसीतील कंपनीत काम करतात. कंपनीतील साहित्य खरेदी करण्यासाठी सचिन गवळी सोमवारी सायंकाळी दुचाकीवरून बाहेर पडले होते. वाळूज एमआयडीसीतील संभाजी चौकात पाठीमागून मोपेडवर ( एमएच २० डीएस ५४८५) ट्रिपल सीट आलेल्या तिघांनी त्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करून दुचाकीसमोर मोपेड उभी केली. अनोळखी तरुणाने त्यांच्याकडे मोबाइल मागितला. मात्र, मोबाइल देण्यास त्यांनी नकार दिल्याने तिघांनी त्यांना मारहाण सुरू केली. रस्त्याने ये-जा करणारे वाहनस्वार व नागरिक मदतीसाठी धावले. बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने पकडले जाण्याच्या भीतीचे तिघे हल्लेखोर मोपेड सोडून पळून गेले. या मारहाणीत गंभीर जखमी गवळी यांना योगेश साळे यांनी बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अजय जाधव ऊर्फ अज्जू, योगेश दोडवे व हेमंत पुंड (सर्व रा. बजाजनगर) या तिघा हल्लेखोरांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फोटो- सचिन गवळी (जखमी)
-----------------------