भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार कामगार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 03:55 PM2021-06-09T15:55:04+5:302021-06-09T15:55:35+5:30

मंगळवारी रात्री कंपनीतून कामावरून परतत असताना झाला अपघात

Two-wheeler worker killed in container collision at Waluj | भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार कामगार ठार

भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार कामगार ठार

googlenewsNext

वाळूज महानगर : कंपनीतील काम संपल्यानंतर दुचाकीवरुन घरी परतणाऱ्या कामगाराच्या दुचाकीस कंटेनरने धडक दिल्याने दुचाकीस्वार कामगार गंभीर जखमी होऊन ठार झाल्याची घटना मंगळवार (दि.८) रात्री ११ वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसीत घडली. सुभाष सोमीनाथ आरगडे (३२ रा.मनिषानगर, वाळूज) असे मृत कामगाराचे नाव आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, सुभाष सोमीनाथ आरगडे (३२ रा.मनिषानगर, वाळूज) हे वाळूज एमआयडीसीतील ए.बी. इंजिनिअरींग (सी-सेक्टर-१५८) या कंपनीत वायर कटींग आॅपेरटर म्हणून काम करतात. मंगळवार (दि.८) नेहमीप्रमाणे सुभाष आरगडे हे कंपनीत कामासाठी गेले होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास कंपनीतुन सुट्टी झाल्यानंतर आरगडे दुचाकीवरून (क्रमांक एम.एच.२०, सी.ए.७०१७) घरी जाण्यासाठी निघाले. क्रॉम्प्टन अ‍ॅण्ड ग्रिव्हज या कंपनीजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने (क्रमांक एन.एल.०१, जी.०६००) आरगडे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात आरगडे गंभीर जखमी झाले. कामगारांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना माहिती अपघाताची माहिती दिली. यानंतर तुकाराम कांबळे व इतर कामगारांनी सुभाष आरगडे यांना गंभीर जखमी आवस्थेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. 

कंटेनर चालक फरार
दरम्यान, अपघातानंतर कंटेनरचालक फरार आहे. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला असून चालकाचा शोध सुरु आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात फरार कंटेनर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र बांगर हे करीत आहे.

Web Title: Two-wheeler worker killed in container collision at Waluj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.