पैठण -पाचोड रस्त्यावर २ दुचाकींची धडक; २ ठार,२ गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:32 AM2017-12-05T00:32:22+5:302017-12-05T00:32:29+5:30

पैठण -पाचोड रस्त्यावर ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सोलनापूर फाट्याजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले.

Two-wheelers hit Paithan road; 2 killed, 2 serious | पैठण -पाचोड रस्त्यावर २ दुचाकींची धडक; २ ठार,२ गंभीर

पैठण -पाचोड रस्त्यावर २ दुचाकींची धडक; २ ठार,२ गंभीर

googlenewsNext

पैठण : पैठण -पाचोड रस्त्यावर ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सोलनापूर फाट्याजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना सोमवारी दुपारी चार वाजता घडली. अपघात नेमका कसा झाला, हे जखमींचा जबाब घेतल्यानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
या अपघातात भारत ज्ञानेश्वर नेमाणे (२४) व शुभम रत्नाकर सोनवणे (२१, दोघे रा. पाचोड) हे तरुण मरण पावले, तर आकाश विश्वनाथ मगरे (१९), आकाश आबासाहेब थोरात (२०, रा. सर्व पाचोड) हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले. पैठण येथील शासकीय रुग्णालयात उपचार करून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. हे चारही तरूण मोटारसायकलने एका विवाह सोहळ्यासाठी पैठण येथे आले होते. लग्न आटोपून दोन वेगवेगळ्या दुचाकीवरून पाचोडकडे जात असताना हा अपघात झाला. घटनास्थळी जखमी अवस्थेत असलेल्या या तरुणांना आपेगाव येथील माऊली मुळे, लक्ष्मण बनकर, सुनील मेहेत्रे, चंद्रकांत झारगड यांनी पैठण रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकारी संदीप रगडे, शैलेश साळवे यांनी जखमींवर उपचार केले.
रुग्णासोबत जाण्यासाठी
कुणीही पुढे आले नाही
पैठण रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर जखमींना १०८ रूग्णवाहिकेद्वारे औरंगाबाद येथे घेऊन जाण्याचा निर्णय झाला. दरम्यान, रूग्णालयात शेकडो जण उपस्थित असताना रूग्णासोबत जाण्यास कुणीही तयार होत नव्हते. पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पो. कॉ. लालचंद नागलोत, भगवान गायकवाड, किशोर शिंदे यांनी चर्चा करून एकास या गाडीसोबत पाठवले. अपघात झाल्यानंतर कुणी पुढे येत नाही हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
सहा महिन्यांपूर्वीच झाला होता भारतचा विवाह
या अपघातात मरण पावलेल्या भारत नेमाणेचा विवाह सहा महिन्यांपूर्वीच झाला होता. पाचोड येथे मोसंबी ज्युस सेंटर भारत चालवत होता. भारतच्या अपघाती मृत्यूने पाचोड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Two-wheelers hit Paithan road; 2 killed, 2 serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.