लग्नाचे आमिष दाखवून दोन महिलांनी नावे करून घेतली शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:05 AM2021-02-05T04:05:11+5:302021-02-05T04:05:11+5:30
याप्रकरणी लक्ष्मण कचरू जाधव (वय ५५) यांनी उपविभागिय पोलीस अधिकारी वैजापूर यांच्याकडे तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार त्यांची दसकुली शिवारात ...
याप्रकरणी लक्ष्मण कचरू जाधव (वय ५५) यांनी उपविभागिय पोलीस अधिकारी वैजापूर यांच्याकडे तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार त्यांची दसकुली शिवारात गट क्रमांक ३३/१ मध्ये शेतजमीन आहे. या जमिनीपैकी ६९ गुंठे (आर) शेतजमीन वैजापूर शहरातील पाटील गल्ली येथील उषा त्र्यंबक गुंजाळ या महिलेने लग्न करण्याचे आश्वासन देऊन बळकावली आहे. या महिलेने कुठलाही मोबदला न घेता लक्ष्मण यांच्या सातबारावर नाव लावून घेतले. या व्यवहारात तीने शिऊर बंगला येथील रामचंद्र कारभारी जाधव यांची मदत घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच कल्पना छबू जगताप (रा. रामवाडी, पुणतांबा) या महिलेनेही लग्न करते असे आश्वासन देत लक्ष्मण व त्यांच्या आईची फसवणूक करून याच गटातील १ हेक्टर ३४ आर शेतजमीन रामचंद्र कारभारी जाधव यांना विकली. जमीन विक्री करुन कल्पना जगताप ही खंडाळा येथील ज्ञानेश्वर वाघमारे याच्यासोबत पळून गेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. २ जानेवारी रोजी लक्ष्मण यांची पत्नी रेखा ही शेतात काम करीत असताना शंकर जाधव, किशोर जाधव व इतर व्यक्ती तेथे आले व त्यांनी शिवीगाळ करून जमिनीतून बेदखल करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.