सरकारचे दोन वर्षे हे खोक्याचे, टक्केवारीचे, महाराष्ट्राला अधोगतीला नेणारे; अंबादास दानवेंची टीका

By संतोष हिरेमठ | Published: June 30, 2024 02:50 PM2024-06-30T14:50:22+5:302024-06-30T14:51:08+5:30

‘लाडकी बहिण योजना‘ जाहीर केली. परंतु अटी, शर्थीमुळे फार मोजक्या महिलांना योजनेची मदत मिळेल.शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या. परंतु १५ हजार कोटी रुपये शेतकऱ्याचे देणे आहे.'

Two years of the government was of extortion, percentage, leading to the decline of Maharashtra; Criticism of Ambadas Danwe | सरकारचे दोन वर्षे हे खोक्याचे, टक्केवारीचे, महाराष्ट्राला अधोगतीला नेणारे; अंबादास दानवेंची टीका

सरकारचे दोन वर्षे हे खोक्याचे, टक्केवारीचे, महाराष्ट्राला अधोगतीला नेणारे; अंबादास दानवेंची टीका

छत्रपती संभाजीनगर : जे दोन वर्षे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात होते, त्यांनी शिवसेना फोडण्याचे, गद्दारीचे काम केले. सध्याच्या सरकारचे दोन वर्षे हे खोक्याचे, टक्केवारीचे, महाराष्ट्राला अधोगतीला नेणारे आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. सरकारच्या दोन वर्षाच्या कालावधीविषयी बोलताना अंबादास दानवे यांनी हे विधान केले.

माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ‘लाडकी बहिण योजना‘ जाहीर केली. परंतु अटी, शर्थीमुळे फार मोजक्या महिलांना योजनेची मदत मिळेल.शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या. परंतु १५ हजार कोटी रुपये शेतकऱ्याचे देणे आहे. राज्यात २५ हजार कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प असताना विविध घोषणांचा अमलबजावणी कशी होईल, असा प्रश्न आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात विजेचा दर जास्त आहे. ग्रामीण भागात २ ते ४ तासांवर वीज मिळत नाही.

वीजेची कमतरता आहे. वीज मिळतच नाही, मोफत वीजेचा काय फायदा होईल, हे येणाऱ्या काळात दिसेल. शेतकऱ्यांना दिलेल्या मोफत वीजेची घोषणा फार्स ठरण्याची शक्यता आहे. सरकारकडे असलेली वीज आणि शेतकऱ्याला लागणारी वीज याचे प्रमाण काढले तर शेतकऱ्याला वीज मिळणे अवघड आहे, असे अंबादास दानवे म्हणाले. पीक विमा एक रुपयात देण्याची घोषणा सरकारने केली.

शेतकऱ्यांचा वाटा सरकारने भरला. परंतु पीक विमा कंपन्यांच्या दादागिरी वाढली आहे. महाज्योती, सारथी, बार्टी या सगळ्या योजनांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. विद्यार्थ्यांना सवलती मिळालेल्या नाहीत. दुधाची भुकटी आयात करण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या विरोधातील असल्याचेही दानवे म्हणाले.

Web Title: Two years of the government was of extortion, percentage, leading to the decline of Maharashtra; Criticism of Ambadas Danwe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.