दोन वर्षे समाजसेवेच्या अटीवर गुन्हा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 03:08 PM2018-04-28T15:08:48+5:302018-04-28T15:15:50+5:30
दोन वर्षांपर्यंत बीड येथील शांतीवन आश्रमात प्रत्येक महिन्याला दोन दिवस समाजसेवा करण्याच्या अटीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे व न्या. विभा कंकनवाडी यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याविरुद्धचा ‘जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा’ गुन्हा रद्द केला.
औरंगाबाद : दोन वर्षांपर्यंत बीड येथील शांतीवन आश्रमात प्रत्येक महिन्याला दोन दिवस समाजसेवा करण्याच्या अटीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे व न्या. विभा कंकनवाडी यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याविरुद्धचा ‘जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा’ गुन्हा रद्द केला.
बीड येथील गणेश शिराळे याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. गणेश हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. मित्राच्या बहिणीची छेड काढल्यावरून झालेल्या चाकूहल्ल्याच्या प्रकरणात हा गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे गणेशने खंडपीठात आव्हान दिले होते. गणेशच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करीत सुधारण्याची संधी म्हणून शांतीवन आश्रमात समाजसेवा करावी व त्याचे प्रमाणपत्र घ्यावे, असे आदेश खंडपीठाने दिले.