भीषण अपघातात दोन तरुण डॉक्टर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:08 AM2018-02-21T01:08:40+5:302018-02-21T01:08:43+5:30

परिसरातील हॉटेलवर जेवण करून जालना रोडने औरंगाबादकडे येणा-या डॉक्टरांच्या कारचा रामनगर कमानीजवळ झाडाला धडकून मंगळवारी रात्री अडीच वाजेदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुण डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला, तर एक डॉक्टर गंभीर जखमी झाला.

Two young doctors killed in a horrific accident | भीषण अपघातात दोन तरुण डॉक्टर ठार

भीषण अपघातात दोन तरुण डॉक्टर ठार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : परिसरातील हॉटेलवर जेवण करून जालना रोडने औरंगाबादकडे येणा-या डॉक्टरांच्या कारचा रामनगर कमानीजवळ झाडाला धडकून मंगळवारी रात्री अडीच वाजेदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुण डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला, तर एक डॉक्टर गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
तीन डॉक्टर मित्र कारने (क्रमांक- एमएच २० डी.व्ही. ४९३२) जालना येथे मित्राकडे कार्यक्रमाला गेले होते. जालन्याहून परत येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रामनगर कमानीजवळ झाडावर धडकली. या अपघातात डॉ. गोविंदकुमार सतनामसिंग (२५, रा. हरियाणा, ह. मु. सिडको), डॉ. लक्ष्मीकांत दगडिया (२५, रा. म्हाडा कॉलनी, रामनगर) या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर डॉ. अरविंद पवार (२५, रामनगर) हे गंभीर जखमी झाले. पुलाजवळ असलेल्या झाडाला कार १३० च्या स्पीडमध्ये येऊन धडकली. त्यामुळे गाडीची उजवी बाजू पूर्णत: डाव्या बाजूला स्टेअरिंगसह दबली. गंभीर जखमींना मुकुंदवाडी पोलिसांनी क्रेनच्या साह्याने ओढून बाहेर काढले व शासकीय दवाखान्यात दाखल केले. डॉ. गोविंदकुमार सतनामसिंग, डॉ. लक्ष्मण दगडिया या दोघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
सिंग व दगडिया, पवार या तिघांनीही गेल्याच वर्षी शहरातील महाविद्यालयातून बीएचएमएस ही पदवी प्राप्त करून येथील रुग्णालयातून त्यांनी काम सुरू केले होते.
सिंग व दगडिया दोघेही सांगवीकर हॉस्पिटल येथे काम करीत होते, तर अरविंद पवार हे काही दिवस अ‍ॅपेक्स हॉस्पिटल येथे कार्यरत होते. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास फौजदार संजय बनसोड, पोहेकॉ मुंडे, ढवळे करीत आहेत.
नुकतेच पासआऊट झालेल्या या तिघांनी फुलंब्री येथे दवाखाना सुरू करण्याची जुळवाजुळव केली होती. स्वत:चे हॉस्पिटल सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यात असतानाच त्यांच्यावर नियतीने घाला घातला.
१६ मे ला लक्ष्मीकांतचा होता विवाह
तिघे वर्गमित्र सांगवीकर दवाखान्याच्या इमारतीचे मालक अंकुश भुसारे यांची कार घेऊन जालना येथे गेले होते. १६ मे ला लक्ष्मीकांत दगडिया यांचा विवाहदेखील ठरला होता. हात पिवळे होण्याअगोदरच काळाने घाला घातल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Two young doctors killed in a horrific accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.