दोन तरुणी चुकून ‘सचखंड’मध्ये बसल्या, रेल्वे थांबत नसल्याने उडी मारण्याचा प्रयत्न

By संतोष हिरेमठ | Published: August 24, 2022 08:17 PM2022-08-24T20:17:52+5:302022-08-24T20:18:08+5:30

तिकिट निरीक्षकांची सतर्कता,  दोन तरुणींना दिला मदतीचा हात 

Two young women mistakenly sat in 'Sachkhand express ', tried to jump as the train did not stop | दोन तरुणी चुकून ‘सचखंड’मध्ये बसल्या, रेल्वे थांबत नसल्याने उडी मारण्याचा प्रयत्न

दोन तरुणी चुकून ‘सचखंड’मध्ये बसल्या, रेल्वे थांबत नसल्याने उडी मारण्याचा प्रयत्न

googlenewsNext

औरंगाबाद : चुकून सचखंड एक्स्प्रेसमध्ये बसलेल्या दोन तरुणींनी रेल्वे लासूर स्टेशन येथे थांबत नसल्याचे पाहून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी घडली. मात्र, सतर्क तिकिट निरीक्षकांनी वेळीच दोघांना रोखले. त्यामुळे दोघी बालबाल बचावल्या.

लासूर येथील रहिवासी असलेल्या या दोन्ही तरुणी औरंगाबादहून सचखंड एक्स्प्रेसमध्ये बसला. परंतु ही रेल्वे लासूर स्टेशनवर न थांबता पुढे रवाना होत होती. त्याच वेळी आपण चुकीच्या रेल्वेत बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे दोघींनी रेल्वेतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु हा सगळा प्रकार निदर्शनास पडल्याने तिकिट निरीक्षकांनी दोघींना रोखले. सचखंड एक्स्प्रेस तारुर येथे क्राॅसिंगसाठी थांबली. त्याच वेळी मराठवाडा एक्स्प्रेस आली. या दोन्ही तरुणींना मराठवाडा एक्स्प्रेसमधून लासूर स्टेशन येथे आणण्यात आले. रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी, रेल्वे अधिकारी-कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बल, शिल्लेगाव पोलिसांनी मदत केली.

Web Title: Two young women mistakenly sat in 'Sachkhand express ', tried to jump as the train did not stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.