लग्नाचे आमिष दाखवून दोन तरुणींवर अत्याचार; छावणी, उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा

By राम शिनगारे | Published: March 14, 2023 06:22 PM2023-03-14T18:22:14+5:302023-03-14T18:23:34+5:30

वारंवार अत्याचार करून लग्नासाठी केली टाळाटाळ

Two young women sexually assaulted by luring them into marriage; Crime in Cantonment, Usmanpura Police Station | लग्नाचे आमिष दाखवून दोन तरुणींवर अत्याचार; छावणी, उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवून दोन तरुणींवर अत्याचार; छावणी, उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : तेवीस आणि एकोणतीस वर्षांच्या दोन युवतींना लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गुन्हा छावणी व उस्मानपुरा पोलिस ठाण्यात १३ मार्च रोजी दाखल करण्यात आला आहे. उस्मानपुरा प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात आले आहे.

पहिली अत्याचाराची घटना पडेगाव भागात घडली आहे. ईश्वर एकनाथ साळवे (रा. पडेगाव, सप्तश्रृंगी) याने ब्युटीपार्लरचा व्यवसाय करणाऱ्या तरुणीला २०१९ पासून लग्न करण्याचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार केले. मागील काही दिवसांपासून तो लग्नासाठी टाळाटाळ करीत होता. १२ मार्च रोजी पीडिता आरोपी ईश्वर यास लग्नाविषयी विचारण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. तेव्हा तिला ईश्वरसह त्याची आईसह सहा बहिणींनी बेदम मारहाण केली. त्यामुळे पीडितेने थेट छावणी पोलिस ठाणे गाठत सर्वांच्या विरोधात तक्रार नोंदवली. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक पांडुरंग डाके करीत आहेत. 

दुसरी घटना उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. तेवीस वर्षीय तरुणीला स्वप्नील दिपक खंकाळ (२७, रा. सिद्धार्थनगर, करकंब, ता. पंढरपुर, जि. सोलापुर) या युवकाने मे २०२२ पासून लग्नाचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. पीडितेने लग्नाची मागणी केल्यानंतर आरोपी स्वप्नील खंकाळ याच्यासह रोहित शिवशरण (रा. पंढरपुर, जि. सोलापुर) या दोघांनी तिच्या एक महिन्याच्या मुलीला पळवून नेले. तेव्हा पीडितेने उस्मानपुरा पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर दोन्ही आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास निरीक्षक गिता बागवडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Web Title: Two young women sexually assaulted by luring them into marriage; Crime in Cantonment, Usmanpura Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.