दोन युवकांचा विहिरीत पडल्यामुळे मृत्यू, नायगाव फाटा, सातारा परिसरातील घटना
By राम शिनगारे | Published: April 9, 2023 09:08 PM2023-04-09T21:08:44+5:302023-04-09T21:08:51+5:30
फुलंब्री, सातारा पोलिस ठाण्यात नोंद
छत्रपती संभाजीनगर : मित्रांसाेबत पाेहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षाच्या तरुणाचा विहिरील तोल जाऊन पडल्यामुळे तर हर्सुल-सावंगी शिवारात विहीरीत पडलेल्या युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोन्ही मुलांना अग्नीशमन विभागाच्या पथकाने विहिरीबाहेर काढले. या प्रकरणी फुलंब्रीसह सातारा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.
पहिल्या घटनेत ऋषिकेष निवृत्ती निकम (१६, रा. पुंडलिकनगर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चार मित्र सातारा परिसरातील गट नंबर २३२ मधील विहिरीवर पोहण्यासाठी गेले होते. ऋषिकेशला फिटचा त्रास असल्यामुळे तो विहिरीच्या कडेलाच थांबला होता. फिट आल्यानंतर त्याचा तोल जाऊन तो वाहिरीत पडला. घटनेची माहिती सोबतच्या मुलांनी ऋषिकेशच्या मामाला दिली. त्यानंतर सातारा पोलिसांना माहिती समजताच निरीक्षक प्रशांत पोतदार, उपनिरीक्षक संभाजी गोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्नीशमनच्या पथकास बोलावून घेत मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.
दुसरी नायगाव फाट्यापासून हर्सुल-सावंगी रोडवरील गट नंबर १ शिवारातील वाहिरीत घडली. उमेश मच्छिंद्र रोडे (२२, रा. सावंगी) या युवकाचा वाहिरीत पडल्यामुळे मृत्यू झाला. अग्निशमन विभागास माहिती मिळाल्यानंतर उमेशचा मृतदेह विहिरीतुन बाहेर काढला. ही कारवाई मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांच्या मार्गदर्शनात उप अग्निशमन केंद्र अधिकारी मोहन मुंगसे, ड्युटी अधिकारी विनायक लिमकर, जवान संग्राम मोरे,अशोक पोटे, दिनेश वेलदोडे,आदिनाथ बकले, परमेश्वर साळुंके व शेख आसेफ यांच्या पथकाने केली.