शाळकरी मुलीच्या आत्महत्येप्रकरणी दोन तरुणावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:07 PM2019-05-27T23:07:03+5:302019-05-27T23:07:21+5:30

गारखेडा परिसरातील चुलत्याच्या घरी आलेल्या १५ वर्षीय पूनम अर्जुन वाघाळे हिच्या आत्महत्येप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दोन तरुणांविरुद्ध सोमवारी गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी तरुणाने सोशल मीडियावर अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ टाकून बदनामी करण्याची धमकी फोनवरून दिल्यानेच पूनमने आत्महत्या केल्याचे समोर आले.

Two youths guilty of school girl's suicide | शाळकरी मुलीच्या आत्महत्येप्रकरणी दोन तरुणावर गुन्हा

शाळकरी मुलीच्या आत्महत्येप्रकरणी दोन तरुणावर गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्दे२४ मे रोजी चुलत्याच्या घरी केली आत्महत्या : गावातील तरुणाने सोशल मीडियावर अश्लील छायाचित्रे टाकून बदनामी करण्याची दिली होती धमकी

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील चुलत्याच्या घरी आलेल्या १५ वर्षीय पूनम अर्जुन वाघाळे हिच्या आत्महत्येप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दोन तरुणांविरुद्ध सोमवारी गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी तरुणाने सोशल मीडियावर अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ टाकून बदनामी करण्याची धमकी फोनवरून दिल्यानेच पूनमने आत्महत्या केल्याचे समोर आले.
सोनू शिवाजी रगडे (रा. झरी, ता. जिंतूर, जि. परभणी) आणि अक्षय आश्रुबा साळवे (रा.रोहेगाव, ता. सेलू, जि.परभणी) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, पूनम वाघाळे (रा.रोहेगाव, ता. सेलू, जि.परभणी) हिने दहावीची परीक्षा दिली होती. गावातील अक्षय साळवे हा त्रास देतो आणि पूनमचा मावसभाऊ सोनू हा अक्षयला मदत करतो म्हणून तिच्या वडिलांनी पूनमला औरंगाबादेतील भारतनगरात राहणारे तिचे चुलते राजेश वाघाळे यांच्याकडे १८ मे रोजी पाठविले होते. त्यानंतर २३ मे रोजी पूनमच्या वडिलांनी सोनू रगडे याला घरी बोलावून त्याला जाब विचारला होता. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्यांनी राजेश यांच्या फोनवरून त्यांनी पूनमला याबाबत विचारणा केली असता तिने अक्षय आणि सोनू हे त्रास देत असल्याचे त्यांना सांगितले. पूनमच्या वडिलासमोर सोनूने पूनमला फोन करून त्यांच्या त्रासाबाबत कोणालाही काहीही सांगू नको, अन्यथा त्याच्याकडील तिघांची अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर टाकून बदनामी करीन अशी धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेल्या पूनमने त्याच रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पूनमचे वडील अर्जुन यांनी सोमवारी अक्षय आणि सोनू यांच्या त्रासाला कंटाळून पूनमने आत्महत्या केल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कापसे तपास करीत आहेत.

Web Title: Two youths guilty of school girl's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.